कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत मागील काही दिवसांपासून नवीन रुग्णांच्या तुलनेत बरे होण्याऱ्या रुग्णांचे प्रमाण जास्त



प्रेस मीडिया वृत्तसेवा : 

पुणे :  शहरा मध्ये कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत मागील काही दिवसांपासून नवीन रुग्णांच्या तुलनेत बरे होण्याऱ्या रुग्णांचे प्रमाण जास्त होते. परंतु आज रुग्णांची कमी असून दीडशे च्या खाली आज रुग्ण सापडले आहेत.पुणे शहरामध्ये गेल्या 24 तासात 106 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर 126 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

पुणे शहरात आजपर्यंत 5लाख 31हजार 75इतके कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहे. त्यापैकी 4लाख 93हजार 005इतके रुग्ण बरे झाले आहेत. पुण्यात गेल्या 24 तासात 3रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये शहरातील तर 2पुणे महापालिका हद्दीबाहेरील 1रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत पुणे शहरात 9064जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.शहरामध्ये सध्या 1056रुग्ण अ‍ॅक्टिव्ह आहेत. त्यापैकी 166रुग्ण गंभीर आहेत, आज दिवसभरात शहरातील विविध केंद्रांवर 5488 स्वॅब तपासण्या करण्यात आल्या आहेत. अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे

Post a Comment

Previous Post Next Post