इचलकरंजीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शिस्तबद्ध संचलन



प्रेस मीडिया वृत्तसेवा :

इचलकरंजी : प्रतिनिधी :

 दसरा महोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर इचलकरंजी येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्यावतीने शिस्तबद्धरित्या संचलन करण्यात आले. शहरातील मुख्यमार्गावर ठिकठिकाणी पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात आले. संचलन पाहण्यासाठी नागरीकांनी रस्त्याच्या दुतर्फा मोठी गर्दी केली होती.

  इचलकरंजीत दसरा महोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्यावतीने दरवर्षी संचलनाचे आयोजन केले जाते. यावर्षी शहरातील महात्मा गांधी पुतळा, छत्रपती संभाजी महाराज चौक, वर्धमान चौक व यशोलक्ष्मी भवन अशा विविध चार भागांतून संचलनास ध्वजपूजन व प्रार्थनेने प्रारंभ झाला. यानंतर संकलनाचे राजर्षी शाहू महाराज पुतळा येथे एकत्रीकरण करण्यात आले. 

संचलनाच्या अग्रभागी भारतमातेची प्रतिमा, मध्यभागी भगव्या ध्वजाचे पथक तर त्यापाठोपाठ शिस्तबद्ध चाललेले स्वयंसेवक आणि छत्रपती शिवाजी महाराज, प्रथम संघचालक डॉ. केशव हेडगेवार, द्वितीय संघचालक माधव गोळवलकर यांच्या प्रतिमा असलेली जीप व घोष पथक यांचा समावेश होता. संचलन मार्गावर अनेक ठिकाणी आकर्षक रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. 

संचलन दरम्यान, श्री शिवतीर्थ येथे माजी आमदार सुरेश हाळवणकर, नगराध्यक्षा अलका स्वामी यांच्यासह भाजप कार्यकर्त्यांनी आणि याचपद्धतीने संचलन मार्गावर ठिक ठिकाणी विविध संस्था, संघटना आणि नागरीकांच्या वतीनेही पुष्पवृष्टी स्वागत करण्यात आले. पुढे ही फेरी मुख्य मार्गावरून श्री शिवतीर्थ मार्गे जयहिंद मंडळावर पोहचल्यावर सांगता झाली. संचलन पाहण्यासाठी नागरीकांनीही रस्त्याच्या दुतर्फा मोठी गर्दी केली होती.

Post a Comment

Previous Post Next Post