पुणे महानगर परिवहन महामंडळाची पुणे दर्शन व रातराणी बससेवा रविवार दि.२४ पासून पुन्हा सुरु



प्रेस मीडिया वृत्तसेवा : अनवरअली शेख :

पुणे महानगर परिवहन महामंडळाची (PMPML) पुणे दर्शन व रातराणी बससेवा रविवार पासून दि.२४ पुन्हा सुरु होणार. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर २२ मार्च २०२० पासून पुणे दर्शन व रातराणी बससेवा बंद करण्यात आलेली होती. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने पीएमपीएमएलच्या वतीने रातराणी व पुणे दर्शन बससेवा पुन्हा सुरु करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

पीएमपीएमएलची रातराणी बससेवा देखील रविवारपासून पूर्ववत सुरु होत आहे. पुणे दर्शन बससेवा पूर्वीप्रमाणेच एसी बसद्वारे पुरविली जाणार आहे . कात्रज, पुणे स्टेशन, हडपसर, निगडी व भोसरी डेपोतून विविध मार्गांवर प्रवाशी नागरिकांच्या सोयीसाठी रातराणी बससेवा पुन्हा सुरु होत आहे.

पीएमपीएमएलच्या डेक्कन व पुणे स्टेशन मोलेदिना येथील पासकेंद्रांवर पुणे दर्शन बसचे तिकीट बुक करता येईल. तसेच www.pmpml.org या वेबसाईट वरून देखील online बुकिंग करता येईल. पुणे दर्शन बस सकाळी ८:४५ वा. पुणे स्टेशन व डेक्कन वरून सुटेल व सायंकाळी ५:३० वा. परत पुणे स्टेशन व डेक्कन या ठिकाणी प्रवाशी व पर्यटकांना पोहोच करेल.पुणे दर्शन बससेवेसाठी फक्त ५०० रूपये तिकीट आहे.


*जाहिरात व बातम्यांसाठी संपर्क 9975071717*

Post a Comment

Previous Post Next Post