कर्जत तहसिलदार विक्रम देशमुख कडून ज्येष्ठ नागरिकांस अपमानास्पद वागणूक :


मस्त्वाल व उर्मट तहसीलदार यांचेवर  कारवाई करण्यात यावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.



प्रेस मीडिया वृत्तसेवा :

रायगड जिल्हा प्रतिनिधी. सुनील पाटील

कर्जत येथील तहसीलदार या पदावर कार्यरत असलेले विक्रम देशमुख व त्यांच्या तहसील कार्यालय मध्ये असलेला एक शिपाई यांनी जनहित प्रतिष्ठान अध्यक्ष श्री अकील रशिद  मुल्ला यांना उद्धट भाषेचा वापर करीत  त्यांना अपमानास्पद वागणूक दिली असल्याचे समोर आले आहे. 

या बाबत अधिक माहिती अशी की, अकील रशीद मुल्ला हे मुक्काम नेरल - कर्जत येथील  एक जेष्ठ भारतीय नागरिक असून ते जनहित प्रतिष्ठान महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त सेवा भावी संस्थेचे  अध्यक्ष असून तसेच भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन न्यास अण्णा हजारे प्रणित महाराष्ट्र नेरल शाखा सदस्य असून त्यांचा समाजामध्ये मान सन्मान आहे. त्यांनी या पूर्वी आंदोलन व उपोषण करून अनेक सार्वजनिक प्रश्न सोडवले आहेत. 

ते दिनांक 18 ऑक्टोंबर 20 21 रोजी आमरण उपोषणासाठी संक्रमण काळात आवश्यक असलेली जागा वापरण्याची परवानगी मिळवण्या साठी तहसीलदार यांच्या कार्यालयात केलेल्या अर्जाची चौकशी करण्यासाठी तहसीलदार यांना भेटण्यासाठी  दिनांक 20 ऑक्टोंबर 20 21 रोजी कर्जत तहसीलला गेले असता तेव्हा कर्जत तहसील कार्यालयात गेले होते. तेथे  उपस्थित असलेले शिपाई यांचे मार्फत आपण भेटण्यासाठी आलो असल्याची चिट्ठी अकील मुल्ला यांनी तहसीलदार कर्जत यांना पाठवली,  तरी ही तहासलदारांनी त्यांना अनेक तास बहेरच गरमित  ताटकळत बसवून स्वतः एअरकण्डीशनरची हवा खात बसले. त्यानंतर अकील मुल्ला यांनी  तहसीलदारांना विचारले  अमरण उपोषण परवानगी घेण्यासाठी साहेब मी आत येऊ का तेव्हा कर्जत तहसीलदार विक्रम देशमुख हे त्यांच्यावर भडकले असता उद्धट भाषेत म्हणाले बाहेर निघ , अजिबात आत मध्ये येऊ नको व तेथे उपस्थित असलेले शिपाई याला बोलून सांगितले. मस्त्वाल व उर्मट तहसीलदार यांचेवर  कारवाई करण्यात यावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post