शाळा तर सुरू झाल्या पण ...शाळेची बस कधी सुरू होणार..?



प्रेस मीडिया वृत्तसेवा : अनवरअली शेख :

पिंपरी चिंचवड : शाळा सुरू झाल्या वर्गात किलबिलाट उसळली परंतु तब्बल दीड वर्षाने शाळा सुरू झाल्या असल्या तरी स्कूल बसची चाके अद्याप रूतलेलीच आहेत . बस सुरू करण्यासाठी शिक्षण संस्थांनी अद्याप बैठका घेतलेल्या नाहीत,तारीख,वेळ, दर ठरविलेले नाहीत . तसेच शाळांमध्ये दिवसाआड विद्यार्थी उपस्थिती आणि सोशल डिस्टन्सिंगचा नियम यामुळे परिणामी दिवाळी सुट्टीनंतरच बस धावण्याची शक्यता  वर्तविली जात आहे . शहरात ३ हजार स्कूल बस धावतात . त्यावर काम करणारे सुमारे ४ हजार ५०० चालक व मदतनीस एका फटक्यात बेरोजगार झाले होते. जणू त्यांचा सर्वांना विसरच पडला होता, दीड - दोन वर्षांपासून स्कूल बस बंद असल्याने बस मालकांचे मागील शैक्षणिक वर्षात हाल झाले, त्यांचा जगण्याचा प्रश्न निर्माण झाला होता या पार्श्वभूमीवर , विद्यार्थ्यांची ने - आण करणाऱ्या बस अनेक महिन्यांपासून बंद अवस्थेत आहे .

*मुळात शाळा सुरू झाल्यानंतर पूर्वीप्रमाणे विद्यार्थी बसकडे येतील का हा प्रश्न आहे . पाचवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचे प्रमाण ६० टक्के असते , तर सहावी - सातवीतील २० टक्के आणि आठवी ते दहावीतील २० टक्के विद्यार्थी असतात . विद्यार्थ्यांची वाहतुकीचा विसर सरकारला पडल्याचे मत चालकांकडून व्यक्त होत आहे .*

काही गाड्यांचा फिटनेस , विमा , पीयूसी यांची मुदत संपलेली आहे . बसची चाके रुतल्याने बँकेचे हप्ते , आरटीओचे कर आदी खर्च वाढले आहेत,  आता शाळा सुरू झाल्याने बस मालकांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या . पण ज्या शाळांमध्ये स्कूल बस किंवा खासगी वाहनांनी विद्यार्थी येतात तिथे एका सीटवर एक विद्यार्थी अशी आसन व्यवस्था असावी , असे निर्देश दिल्यामुळे मालकांच्या समस्या वाढल्या आहेत . वाहनाची फिटनेस चाचणी करून घेण्यासाठी वेळ लागतो . गाड्यांचे सर्व्हिसिंग , साठी पैशांची गरज असते ह्या सगळ्या गोष्टींचा विचार अखेर कौन करणार? बस मदतनीस यांची जमवाजमव करण्यासाठी पुरेसा वेळही सरकारने दिलेला नाही . यामुळे शाळा सुरू झाल्यानंतरही स्कूल बस कोरोनापूर्व काळानुसार धावू शकतील , का ?याबाबत चालकांमध्ये संभ्रम आहे .


*जाहिरात व बातम्यांसाठी संपर्क 9975071717*

Post a Comment

Previous Post Next Post