अकरावीचे ऑफलाइन वर्ग घेण्यास अडचणी येत आहेत.पदवी कॉलेजची अकरावीची पटसंख्या जास्त असल्याने सोशल डिस्टन्सिंग कसे पाळायचे असा प्रश्न



प्रेस मीडिया वृत्तसेवा :

ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेंतर्गत अकरावीचे प्रवेश फुल झालेल्या कॉलेजना वर्ग सुरू करण्यास माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक दत्तात्रय जगताप यांनी परवानगी दिली आहे. मात्र मुंबई परिसरातील अनेक कॉलेजना अकरावीचे ऑफलाइन वर्ग घेण्यास अडचणी येत आहेत.पदवी कॉलेजची अकरावीची पटसंख्या जास्त असल्याने सोशल डिस्टन्सिंग कसे पाळायचे असा प्रश्न का@लेजांसमोर आहे. शिवाय प्राध्यापकांची अनेक पदे रिक्त असल्याने बारावीबरोबरच अकरावीचे वर्ग घेणे कठीण असल्याचे प्राचार्य सांगत आहेत. सध्या तरी अनेक कॉलेज ऑनलाइन पद्धतीने अकरावीच्या विद्यार्थ्यांना शिकवत आहेत.
शहरी भागात आठवी ते बारावी तर ग्रामीण भागात पाचवी ते बारावीपर्यंत शाळा सुरू झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया अद्याप सुरू असली तरी ज्या कॉलेजांमधील प्रवेश पूर्ण झाले आहेत अशा कॉलेजांनी वर्ग घेण्यास सुरुवात करावी, अशा सूचना शिक्षण संचालनालयाने दिल्या आहेत. मुंबईसह नागपूर, नाशिक, अमरावती आणि पुणे महापालिका क्षेत्रात अकरावी ऑनलाइन प्रवेशाची प्रथम येणाऱयास प्रथम प्राधान्य फेरी सुरू आहे. त्यामुळे मुंबईसह अन्य शहरांत अकरावीचे प्रत्यक्ष वर्ग सुरू झालेले नाहीत. शैक्षणिक वर्षातील प्रथम सत्र संपायला आल्याने अकरावीचे वर्ग कधी सुरू होणार असा प्रश्न विद्यार्थी-पालकांना पडला होता. पण आता राज्याच्या शिक्षण संचालकांनी प्राचार्यांना अकरावीचे वर्ग सुरू करण्याची परवानगी दिली आहे. राज्यातील बारावीपर्यंतचे वर्ग सुरू झाले आहेत त्यामुळे ऑनलाइन प्रवेश सुरू असलेल्या महापालिका क्षेत्रात अकरावीचे वर्ग घेण्याची तयारी प्राचार्यांनी करावी, असे जगताप यांनी स्पष्ट केले.


दिवाळीनंतर प्रत्यक्ष वर्ग सुरू करण्याची कॉलेजांची तयारी

अकरावीचे वर्ग सुरू करण्यास का@लेजांसमोर अनेक अडचणी आहेत. पदवी महाविद्यालयात एका तुकडीत 120 विद्यार्थी असतात. या विद्यार्थ्यांची सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाप्रमाणे बसण्याची व्यवस्था करणे कठीण आहे. अनेक कॉलेजमध्ये शिक्षकांची संख्या कमी असल्याने सध्या बारावीबरोबरच अकरावीच्या विद्यार्थ्यांना गटागटात शिकविणे शक्य नाही. त्यामुळे शैक्षणिक वर्षाच्या दुसऱया सत्रात अकरावीच्या विद्यार्थ्यांना कॉलेजमध्ये बोलावण्याचा अनेक का@लेजचा विचार आहे.

अभ्यासक्रम, मूल्यमापनाविषयी कोणत्याही सूचना नाहीत

शालेय शिक्षण विभागाकडून अकरावीचा अभ्यासक्रम, विद्यार्थ्यांचे मूल्यमापन याविषयी कोणत्याही सूचना अद्याप का@लेजना मिळालेल्या नाहीत. ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेमुळे या विद्यार्थ्यांची प्रथम घटक चाचणी आणि आता प्रथम सत्र परीक्षा बुडाली आहे. शिक्षक संचालनालयाने प्रत्यक्षात वर्ग घेण्याच्या सूचना दिल्या असल्या तरी शैक्षणिक वर्ष, अभ्यासक्रम, विद्यार्थ्यांचे मूल्यमापन याविषयी कोणतेही मार्गदर्शन का@लेजना केलेले नाही, असे ज्युनियर का@लेज टीचर्स असोसिएशनचे सदस्य प्रा. हेमंत शिंदे यांनी सांगितले.

Post a Comment

Previous Post Next Post