देहूरोड उड्डाणपूल वरून धबधबा वाहू लागला

 

प्रेस मीडिया वृत्तसेवा : अनवरअली शेख :

पिंपरी चिंचवड : देहूरोड आज दुपारी चार नंतर पावसाने हजेरी लावली बघता बघता पाऊस वाढला परतीचा पाऊस अजून तीन दिवस महाराष्ट्रात  हजेरी लावेल अशी शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. पिंपरी चिंचवड मधील  झालेल्या पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली, सुरवातीच्या काही क्षणात झालेल्या पावसाने रस्त्यावर पाणी साचले. या मुळे काही काळ वाहतूक मंदावली होती. देहूरोड रोड वरील उड्डाणपूला वरून खाली पाण्याचा धबधबा कोसळून वाहत होता,रस्त्यावर पाणीच पाणी साचले होते, पूला खालून जाणाऱ्या वाहनांना प्रचंड मनस्ताप  होत आहे पुलावर साचलेलं पाऊसच पाणी खालून ये जा करणाऱ्या दुचाकी वाहन चालकांच्या अंगावर पडतो म्हणून  अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही, स्थानिक नागरिकांचं म्हणणं आहे की असा पूल प्रथमच देहूरोड मध्ये आहे ज्या वरून पावसात धबधबा  वाहत आहे ,पावसात उड्डाणपूलाची प्रस्तीती पाहता निकृष्ठ दर्जाचे काम  झाल्याचे दिसून येत आहे ,

शहरात चौहीबाजू पावसाने जोर धरला होता,पिंपरीतील रस्ते जलमय झाले होते . पिंपरी अग्निशमन दलाच्या वतीने दिलेल्या माहितीनुसार आकुर्डी व निगडी येथील काही घरांमध्ये पाणी शिरल्याची तक्रार प्राप्त झाल्याचे त्यांनी सांगितले.शहरात दुपारपासूनच ढग दाटून आले होते, उकाडा वाढला होता. अखेर सायंकाळी साडे सहाच्या सुमारास वीज गडगडाटासह पावसाने जोरदार हजेरी लावली. ठिक ठिकाणी रस्त्यावर पाणी साचले होते, तसेच आकुर्डीमध्ये काही घरांमध्ये पाणी शिरले होते तर, शहरातील ब-याच भागातील वीज पुरवठा खंडित झाला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post