देहूरोड धम्म भूमी ऐतिहासिक प्रवेशद्वाराचे मंगलमय उद्घाटन व लोकार्पण सोहळा संपन्न.


धम्म भुमी देहू रोड सामाजिक संस्थेने  आंबेडकर प्रेमी जनतेच्या सहभागातून उभारण्यात आलेल्या जागतिक विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रवेशदाराचे धम्मचक्र परिवर्तन सुवर्ण मंगलमय दिनी वंदनीय भिक्खू संघाच्या उपस्थितीत वंदनीय भंते धम्मरत्न, भंते दिपरत्न यांच्या हस्ते ऐतिहासिक मंगलमय उद्घाटन व लोकार्पण सोहळा संपन्न झाला.             

प्रेस मीडिया वृत्तसेवा :  अनवरअली शेख :

 देहूरोड : धम्मा भुमी देहू रोड सामाजिक संस्थेने धम्म बांधव आंबेडकरी प्रेमी जनतेच्या सहभागातून उभारण्यात आलेल्या विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जागतिक प्रवेशद्वाराचे उध्दघाटन लोकार्पण सोहळ्यानिमित्त देहूरोड मधून भिक्खू संघाच्या बुद्धम् शरणम्,गच्छामि, या मंजुळ स्वरातील वंदनेने सबका मंगल होय रे, सबका मंगल होये रे, या वंदनीय भंतेच्या आशीर्वादाने देहूरोड शहर दुमदुमून गेले. यानिमित्त भंते धम्म रत्न ,भंते दीप रत्न धम्मपद मॉनिट्रीज तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर या संघाच्यावतीने काढण्यात आलेल्या धम्मा रॅली ला शितळानगर धम्म सदन बुद्ध विहार येथून प्रारंभ झाला.तेथुन मामुर्डी शितला नगर येथे भिक्खूनचा स्वागत स्वीकारत पंडित चाळ येथे पीपल्स रिपब्लिकन पक्षाच्या वतीने परशुराम दोडमनी यांनी स्वागत केले. 

आंबेडकर नगर मधून संघाची गांधिनगर कार्यालयासमोर आगमन होताच फुलांचा वर्षाव प्रत्येक भंते त्यांच्या पायावर पाणी फुले अर्पण करून वंदन केले. यावेळी झोपडपट्टी संघाचे विजय पवार, ज्येष्ठ पत्रकार अशोक कांबळे, ह्युमन राईट्स जस्टीस असोसिएशनचे सरचिटणीस व पत्रकार चंद्रशेखर पात्रे,जेष्ठ नेते प्रकाश कांबळे, धर्मपाल कांबळे, सुनिल पवार, संतोष रोकडे, सागर चव्हाण, प्रशांत कांबळे, दिनेश कुमार, चल्ला मुथू, करण कुमार,स्वप्नील चव्हाण या कार्यकर्त्यांनी भिक्खू संघाला खीर दान केले.

बुध्दम शरणम गच्छामि, धम्मम शरणम गच्छामि, संगम ह मंगल होये रे, भिक्खू संघाच्या मंगल मैत्री सह धम्म आशीर्वादाने काढण्यात  आलेल्या धम्म रॅलीने अवधै देहूरोड दुमदुमून गेले. धम्म रॅलीचे आगमन डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ आल्यावर तेथे देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या माजी उपाध्यक्षा सारिका ताई नाईकनवरे ,अमोल नाईकनवरे यांच्या हस्ते विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पमाला अर्पण करून अभिवादन केले. धम्मभूमी ऐतिहासिक बुद्धविहारात धम्म रत्न, दिप रत्न या भिक्खू संघाने भगवान गौतम बुद्ध मूर्तीचे दर्शन घेतल्यानंतर भिक्खू संघाची धम्म रॅली बाजारपेठेतून ऐतिहासिक सुभाषचंद्र बोस चौकात फटाक्यांच्या आतिषबाजीत रिपब्लिकन पक्षाचे जेष्ठ नेते बाळासाहेब भागवत, रिपब्लिकन शहराध्यक्ष सुनील गायकवाड, इंन्‍द्रपाल सिंह रतू, राष्ट्रीय उत्सव समितीचे अमोल व्यवहारे, महावीर शेठ बरलोटा, देहूरोड राष्ट्रवादी काँग्रेसचे नवनिर्वाचित राष्ट्रवादी युवक  शहराध्यक्ष अशिष बंसल यांनी स्वागत केले. यावेळी दोन्ही भंते यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास वंदन केले. 

धम्म रॅली स्वामी विवेकानंद चौकातून विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वाराजवळ आगमन झाल्यावर धम्म रॅली चे रूपांतर उद्घाटन सोहळ्यात झाले ,तेथे भिक्खू संघाच्या उपस्थित विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जागतिक प्रवेशद्वार शिल्पाचे उद्घाटन ,लोकार्पण सोहळ्याचे उद्घाटन भंते धम्म रत्न, दीप रत्न यांनी रिबीन कापून केली, धम्म मंचावर झालेल्या धम्म सोहळ्यात प्रारंभी धम्मभूमी देहूरोड सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष के. एच. सूर्यवंशी यांनी उपस्थितांचे स्वागत केले, यावेळी भिक्खू संघ बोधा आचार्यांनी भिक्खू संघ बौद्धा आचार्यांनी बुद्ध वंदना घेतल्यानंतर वंदनीय भंते धम्म रत्न, भंते दीपक रत्न यांनी उपस्थितांना मंगलमय आशीर्वाद दिला. के. एच. सूर्यवंशी यांनी आपल्या प्रास्ताविकेत जागतिक प्रवेशद्वाराचे महत्त्व सांगून या कामे महत्त्वपूर्ण योगदान दिलेल्या प्रवेशद्वाराचे शिल्पकार संजय शेंडे, राजेंद्र बढेकर, सुधाकर नगरे, राजाराम अस्वरे, अमोल नाईकनवरे, रोहन गायकवाड, रहमान खानसह प्रवेशद्वार उभारण्याकामी आर्थिक दान दिलेल्याच्या भंते यांच्या हस्ते जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मान केला. 

यावेळी ऐतिहासिक प्रवेशद्वाराची परवानगी देणारे देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी रामस्वरूप हरितवाल यांनी भगवान गौतम बुद्ध बाबत सांगितले की दुःख है, तो दुःख का कारण है, दुःख का कारण है, तो उसका निवारण भी है, अशा शब्दात या ऐतिहासिक प्रवेश द्वार सोहळ्याचे भव्य उद्घाटनचा मी ही साक्षीदार झालो आहे तसेच मला डॉ बाबासाहेब आंबेडकर याचा संविधानाचा मला अभिमान आहे,

असे मनोगत व्यक्त केले. यावेळी माजी मंत्री आमदार संजय उर्फ बाळा भेगडे, विद्यमान आमदार सुनिल अण्णा शेळके, सामाजिक धार्मिक, शैक्षणिक राज्यकीय व विविध क्षेत्रातील पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते. 



पिंपरी चिंचवड प्रतिनिधी  अन्वरअली शेख 

*जाहिरात व बातम्यांसाठी संपर्क 9975071717*

Post a Comment

Previous Post Next Post