पोयंजे येथील आधार कार्ड शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद



प्रेस मीडिया वृत्तसेवा :

पनवेल : सुनील पाटील :

पनवेल(प्रतिनिधी) आमदार महेश बालदी यांच्या प्रयत्नाने उरण विधानसभा मतदार संघात आधार कार्ड शिबिराचे आयोजन करण्यात आले असून त्या अंतर्गत पोयंजे येथे आज (दि. १८) झालेल्या शिबिरात १५० हुन अधिक नागरिकांनी लाभ घेत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. 

        उरण विधानसभा मतदार संघाचे आमदार महेश बालदी यांच्या मागणी व पाठपुराव्याने महसूल विभाग पनवेल यांच्या तर्फे महास्वराज अभियान अंतर्गत आधारकार्ड शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने पोयंजे येथे आधारकार्ड शिबिराचे आयोजन करण्यात आले. 

यावेळी भाजपचे पोयंजे पंचायत समिती विभागीय अध्यक्ष प्रविण ठाकूर, माजी तालुकाध्यक्ष तानाजी खंडागळे, आशाताई म्हसकर, ग्रामपंचायत सदस्य मंदार चोरघे, रोहिदास चोरघे, पोयंजे अध्यक्ष अशोक भोईर, दीपक भोईर, कल्पेश गायकर, केशव ठाकूर, प्रदिप ठाकूर मंडल अधिकारी प्रभाकर नाईक, तलाठी रुपाली नाखवा, प्रकाश पडवळ, अंगणवाडी सेविका जयश्री चोरघे,यांच्यासह कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते. या शिबिरात नविन आधारकार्ड काढणे, आधारकार्ड दुरुस्ती करणे, संपर्क क्रमांक लिंक करणे आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात आले. या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. त्यामुळे एक दिवसात हे शिबीर पूर्ण न झाल्याने मंगळवार दिनांक १९ ऑक्टोबरलाही आधारकार्ड शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post