शिवसेनेचे वतीने उरण शहरात प्रभाग वाईज व फिरता लसीकरण कार्यक्रम संपन्न .

 


प्रेस मीडिया वृत्तसेवा :

पनवेल : सुनील पाटील :

शिवसेना उरण शहरच्या वतीने संपूर्ण शहरात प्रभाग वाईज लसीकरण व फिरता लसीकरण कार्यक्रम  संपन्न झाला.   शिवसेना जिल्हाप्रमुख  मा आमदार श्री मनोहरशेठ भोईर व शिवसेना गटनेते श्री गणेश शिंदे* यांच्या  मार्गदर्शनाखाली  मोफत  COVAXIN व covidshild लसीचे डोस अठरा वर्षा वरील नागरिकांना उपलब्ध करण्यात आले होते, या मध्ये पहिला व दुसरा  डोस यांचा समावेश होता. सदर लसीकरण कार्यक्रम उरण शहरात सलग दहा दिवस तर फिरता लसीकरण कार्यक्रम एक आठवडा राबविण्यात आला. फिरता लसीकरण कार्यक्रमात एका फोन ने  लसीकरण मोबाईल व्हॅन उरण शहरातील नागरीकांच्या घराजवळ उपलब्ध केली जात होती.

 शिवसेनेच्या वतीने कोविड लसीकरण कार्यक्रम व फिरता लसीकरण कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त करून शिवसेनेचे आभार मानले आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post