देहूरोड कॅन्टोन्मेंट (छावणी) प्रशासक पदी नियुक्ती झाल्या बद्दल आज ऐड, कैलास पानसरे यांचा विविध संघटनान तर्फे अभिनंदन करण्यात आले.

 


प्रेस मीडिया वृत्तसेवा : अनवरअली शेख :

देहूरोड दि. १८- संरक्षण मंत्रालयाकडून देहूरोड कॅन्टोन्मेंट (छावणी) बोर्ड प्रशासक पदी एडवोकेट कैलास पानसरे यांची नियुक्ती करण्यात आली, आणि आज यांचा देहू रोड कॅन्टोन्मेंट बोर्ड सभाग्रहात पदग्रहण समारंभ संपन्न झाला. 

ॶॅड. कैलास पानसरे यांनी देहूरोड बाजारपेठेतील ऐतिहासिक सुभाष चंद्र बोस चौकात नेताजी सुभाषचंद्र बोस, छत्रपती शिवाजी महाराज, कॅन्टोन्मेंट रूग्णालयात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना पुष्पमाला अर्पण करून अभिवादन केले.

हुमान राइट्स असोसिएशन फॉर प्रोटेक्शन च्या वतीने एडवोकेट कैलास पानसरे यांना शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी मावळ तालुका उपाध्यक्ष रज्जाक शेख, देहूरोड शहराध्यक्ष विजय पवार, उपाध्यक्ष दीपक मधुरकर, जनसंपर्क अधिकारी प्रशांत जोगदंड, सिद्धार्थ कांबळे, उपस्थित होते.मावळ तालुका अध्यक्ष रज्जाक शेख यांनी देहूरोड शहर लोकप्रतिनिधी प्रशासक एडवोकेट कैलास पानसरे यांना पुष्पगुच्छ देऊन  शुभेच्छा दिल्या

भीम आर्मी भारत एकता मिशन महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मा.सितारामजी गंगावणे,यांच्या मार्गदर्शनाखाली भीम आर्मी देहूरोड शहर,व मावळ तालुकाच्या वतीने ॲड. कैलास पानसरे यांची देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या प्रशासक पदी नियुक्ती झाल्याबद्दल अभिनंदन व सत्कार करण्यात आला.तसेच त्यांच्याकडून भविष्यात जनतेची चांगली कामे होतील,अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.. 

यावेळी भीम आर्मी मावळ तालुका अध्यक्ष प्रकाश म्हासे, देहूरोड शहर उपाध्यक्ष मनप्रीत सिंग रत्तू, भीमसैनिक बाबु तुपदोर, गणेश पिल्ले, अमोल म्हेत्रे आदि कार्यकर्त्यांनी शुभेच्छा दिल्या, देहूरोड शहरातील विविध संघटना च्या वतीने एडवोकेट कैलास पानसरे यांच्यावर अभिनंदनाचा व शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आले



*जाहिरात व बातम्यांसाठी संपर्क 9975071717*

Post a Comment

Previous Post Next Post