सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशा नुसार तातडीच्या बैठकित ठोस निर्णय घेऊ : खासदार श्रीरंग आप्पा बारणे.

        

बोधिसत्व जन जागृती संघाच्या शिष्टमंडळाला आश्वासन                        

प्रेस मीडिया वृत्तसेवा : अनवरअली शेख :

देहूरोड दि.१९  भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने धार्मिक स्थळ  हे कुणाच्या ही मालकीचे होऊ शकत नाही, असे एतेहासिक निर्णय धीला. जो धर्म स्थळ आहे त्या स्थळ जमीनीचा मालक फक्त स्थळातील वसलेले देवच मालक होय असे निकाल दिलेला आहे. याच मुद्याला धरून बोधिसत्व जनजागृती संघाच्या शिष्टमंडळाने  संसदरत्न.खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांची भेट घेऊन निवेदन दिले. 

त्या  निवेदनात  सर्वोच्च न्यायालयाच्या ऐतिहासिक निकालाच्या आदेशानुसार देहूरोड ऐतिहासिक बुद्ध  विहाराच्या जागेवर मालकी हक्क सांगणारे टेक्सास गायकवाड व इतर यांचे नावे संरक्षण खात्याच्या , संबंधीत असणाच्या खात्याच्या दप्तरी नोंद आहे, ती नावे तातडीने कमी करावीं. त्या ठिकाणी तथागत भ.गौतम बुद्ध व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नावे मालक सदरी दप्तरी नोंद करावे, अशी मागणी निवेदनात मांडली आहे.                    

  या निवेदनात मांडलेल्या मागणी बाबत संघाच्या पदाधिकार्यां  समवेत  खासदार . श्रीरंग आप्पा बारणे यांनी विस्तृत चर्चा केली  खासदार श्रीरंग आप्पा बारणे  यांनी या  निवेदनातील मागणीची दखल घेवून या मागणी संबंधी संरक्षण मंत्रालयाच्या संबंधीत खात्याच्या अधिकार्यांशी तातडीची बैठक घेऊन सर्वोच्च न्यायालयाच्या ऐतिहासिक निकालाच्या आदेशा नुसार योग्य निर्णय घेवू असे ठोस आश्वासन, शिष्टमंडळाला दिले . 

  या शिष्टमंडळात बोधिसत्व जनजागृती संघाच्या अध्यक्षा. संगिता अशोक वाघमारे. उपाध्यक्ष  परशुराम दोडमणी. सचिव  विजय पवार. कार्याध्यक्ष.  श्रीकांत दत्ताजी चोपडे. सह, खजिनदार.  शशिकांत वि. चव्हाण. युवा नेते.  गणेश  जावळे युवा नेते.  सागर लांगे. संघाचे ज्येष्ठ व आंबेडकरी चळवळीचे नेते, रविंंद्र चोपडे , संघाचे मार्गदर्शक अशोक वाघमारे सहभागी होते.


*पिंपरी चिंचवड जिल्हा प्रतिनिधी :  अन्वरअली शेख*

*जाहिरात व बातम्यांसाठी संपर्क 9975071717*

Post a Comment

Previous Post Next Post