उद्योगपती विनोद घोडावत यांच्या कडून आई वृद्धाश्रमाच्या बांधकामास १ लाखांची मदत..



हातकणंगले तालुका प्रतिनिधी -  आप्पासाहेब भोसले

जयसिंगपुरातील प्रसिध्द उद्योगपती आणि दिन दुबळ्यांचे कैवारी, अनाथ, निराधार वृध्दांचे नाथ , तसेच समाजातील शोषित , पिडित आणि वंचितांना मदतीचा हात देणारे जयसिंगपुरातील श्री दानचंदजी घोडावत फॅमिली चॅरीटेबल ट्रस्टचे चेअरमन, प्रसिध्द उद्योगपती विनोदभाऊ  घोडावत यांनी आपल्या ट्रस्टच्या माध्यमातून आई वृध्दाश्रमाच्या बांधकामासाठी १ लाख ५० हजारांची मदत जाहीर केली. त्यापैकी काल १ लाखांचा चेक संस्थेचे अध्यक्ष संजय भोसले तसेच विश्वस्त मंडळाचे सदस्य जेष्ठ पत्रकार दगडु माने , इंजिनियर सचिन डोंगरे , राहुल पोवार आणि राजेंद्र प्रधान यांच्या कडे सपुर्त केला.

कांहीं माणसें जन्मताच दातृत्व लाभलेले आणि उधार मनाची असतात. ज्या समाजामध्ये आपण जन्माला आलो.  त्या समाजाचे आपणही कोठेतरी देणे लागतो . या भावनेतुन ते तन , मन , धन अर्पुन सेवा करत असतात. यापैकीच उद्योगपती विनोद घोडावत हे एक नांव. यांच्या दातृत्वाचा लौकिक तर पुर्ण महाराष्ट्र अनुभवतो आहे.

गेल्याच महिन्यात निमशिरगांव येथे आई वृध्दाश्रमाच्या जागेचे भुमिपुजन आणि पाया भरणी समारंभ पार पडला या कार्यक्रमासाठी विनोद घोडावत प्रमुख पाहुणे तसेच उद्घाटक म्हणून लाभले होते. यावेळी ते बोलतांना आई वृध्दाश्रमाची कहानी डोळ्यात पाणी आणणारी आहे. तसेच आई वृध्दाश्रमाचे कार्य बेजोड आहे या कार्याला तोडचं नाही. असे उदगार काढले होते. तसेच आई वृध्दाश्रमाच्या पाठिशी येथुन पुढे ठामपणे उभे राहण्याचे व मदतीचे आश्वासन दिले होते. आई वृध्दाश्रमाच्या बांधकामाची सुरूवात झाल्याने काल एक लाखांची मदत करण्यात आली. या मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी संस्थेची आणि विश्वस्त मंडळाच्या सदस्यांची मिटींग झाली आणि आई वृध्दाश्रमाच्या हाॅलला विनोद भाऊ घोडावत हे सांगतील ते कायमस्वरूपी नांव देऊन त्यांचा गौरव करण्याचे ठरविण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष संजय भोसले यांनी त्यांचे आभार मानले. 

          संस्थेचे अध्यक्ष संजय भोसले यांनी विनोदभाऊ घोडावत यांनी केलेली मदत आमच्या साठी लाख मोलाची आहे. आई वृध्दाश्रमातील अनाथ , निराधार वृध्दांच्या दु:खावर फुंकर घालणारी आहे. आम्ही त्यांचे हे उपकार कधीही विसरू शकणार नाही. आई वृध्दाश्रम त्यांचे कायमचे ऋणी राहील. अशा भावना व्यक्त करून मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली..

Post a Comment

Previous Post Next Post