सांगली : लसीकरण केले आहे की नाही याची तपासणी आजपासून महापालिका प्रशासन करणार



प्रेस मीडिया वृत्तसेवा : 

 सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका पालिका क्षेत्रात खासगी आस्थापनामध्ये काम करणाऱ्या कामगारांनी लस घेतली आहे की नाही यांची तपासणी आज पासून महापालिका प्रशासन करणार आहे. यासाठी मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त राहुल रोकडे यांच्यासह टीम तपासणी करणार आहे. 

ज्या आस्थापनेत काम करणारे कामगारांनी लस घेतली नसल्यास त्या आस्थापना धारकावर कारवाई करण्यात येणार आहे.महापालिका क्षेत्रात नागरिकांचे १०० टक्के लसीकरण करण्याबाबत महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. नुकताच महापालिकेने महालसीकरण शिबिर घेत एका दिवशी १९,२५५ नागरिकांचे लसीकरण केले आहे. त्यामुळे उर्वरित नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे यासाठी महापालिका प्रशासन प्रयत्नशील आहे.अनेक आस्थापना आणि सुरू असणाऱ्या बांधकाम कामावरील कामगारांनी लसीकरण केले आहे की नाही याची तपासणी आजपासून महापालिका प्रशासन करणार आहे. 

आजपासून महापालिका क्षेत्रात अनेक खासगी आस्थापना, होलसेल दुकाने, मॉल तसेच ज्या ठिकाणी बांधकाम सुरू आहेत तेथील कामगारांनी लसीकरण केले आहे की ,नाही याची तपासणी केली जाणार आहे. ज्या ठिकाणी लसी विना काम करणारे कामगार आढळून येतील तिथे आस्थापना धारकावर कारवाई केली जाणार आहे. यासाठी आयुक्त नितीन कापडणीस यांनी उपायुक्त राहुल रोकडे यांच्या नेतृत्वाखाली सहायक आयुक्तांची पथके तयार केली आहेत. ही पथके आज शुक्रवारपासून आस्थापणाची तपासणी करणार आहेत. त्यामुळे ज्या आस्थापना धारकांना आपल्या कामगारांचं लसीकरण केले नसेल ते कारवाईसाठी पात्र ठरतील असा इशाराही देण्यात आला आहे. त्यामुळे कामगारांनी लस घ्यावी असे आवाहनही महापालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post