डॉ. सुनीता मोरे यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहर उपाध्यक्षपदी नियुक्तीप्रेस मीडिया वृत्तसेवा : 

पुणे : डॉ. सुनीता मोरे यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुणे शहर उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी डॉ.मोरे यांना नियुक्तीचे पत्र दिले.पक्षाच्या स्थापनेपासून कार्यरत असलेल्या डॉ.मोरे यांनी पुणे पालिकेच्या  वृक्ष प्राधिकरणाच्या सदस्य म्हणून काम केले आहे.

 रोटरी,पर्वती नागरी कृती समिती,भगिनी हेल्पलाईन,सुखकर्ता प्रतिष्ठान अशा सामाजिक संस्थांच्या माध्यमातून काम केले आहे.त्यांना आतापर्यंत राष्ट्रीय चिकित्सक सन्मान,माऊली कृतज्ञता गौरव,पर्वती भूषण,बिबवेवाडी भूषण पुरस्कार,स्वयंसिध्दा,गॉड ऑफ अर्थ, 'मी पदवीधर' असे अनेक सन्मान प्राप्त झाले आहेत.कै.खाशाबा मोरे चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून विविध समाजोपयोगी उपक्रम त्या राबवत असतात.

                                                                                                                                                        

PRESS MEDIA

Chief Editor: Mehabub Sarjekhan

Post a Comment

Previous Post Next Post