ब्रेकींग न्युज : दिल्ली : दहा पुस्तके लिहिणाऱ्या डॉ.तुषार निकाळजे या विद्यापीठ शिक्षकेतर कर्मचाऱ्याची वर्ल्ड बुक ऑफ टॅलेंट रेकॉर्डमध्ये झाली नोंद.....



प्रेस मीडिया वृत्तसेवा : 

              डॉ. तुषार निकाळजे हे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात वरिष्ठ सहाय्यक पदावर गेली तीस वर्षे काम करीत आहेत. त्यांनी आजपर्यंत शैक्षणिक ,निवडणूक, संशोधन ,प्रशासन ,कादंबरी या विषयांवर दहा पुस्तके लिहिली आहेत. आजपर्यंतच्या शैक्षणिक इतिहासामध्ये डॉ.निकाळजे हे दहा पुस्तके लिहिणारे पहिले शिक्षकेतर कर्मचारी ठरले आहेत .डॉ.निकाळजे यांचे "भारतीय निवडणूक प्रणाली स्थित्यंतरे व आव्हाने "हे निवडणूक प्रणाली विषयावरील संशोधनात्मक पुस्तक महाराष्ट्रातील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ ,नांदेड ,कवयत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे यांच्या बी.ए व एम .ए या अभ्यासक्रमास संदर्भ पुस्तक म्हणून मान्यता मिळाली आहे .या पुस्तकाचे इंग्रजी भाषांतरित "इंडियन इलेक्शन सिस्टीम "हे पुस्तक देखील प्रकाशित केले आहे .गल्ली ते दिल्ली सामान्य माणसांना न्याय मिळण्यासाठी कागदपत्रांचा उपयोग कसा होऊ शकतो ? याचे विश्लेषण

" लाल फितीतले कागदी घोडे "या पुस्तकात केले आहे. डॉ.निकाळजे यांनी वेगवेगळ्या मासिकांत ,साप्ताहिकांत ,वर्तमानपत्रात, रिसर्च जर्नलमध्ये जवळपास ३२ लेख लिहिले आहेत .या लेखांचे एकत्रित "कळसूत्री बाहुल्यांचा खेळ "हे पुस्तक देखील प्रकाशित केले आहे. पीएच.डी .सारख्या सन्माननीय संशोधनाचा सोयीस्कर अर्थ लावून पदव्या कशा मिळविल्या जातात ?यावर फार्स पीएच.डी.चा" या पुस्तकामध्ये उल्लेख केला आहे. कारकुनाचे आयुष्य किती कष्टप्राय असते ?याची व्यथा "वन बाय टू "या कादंबरीमध्ये नमूद केली आहे .जगातील विद्यापीठांच्या प्रशासकीय कामकाजाची माहिती असणारे

 विद्यापीठ समजून घेताना" हे पुस्तक हरिती पब्लिकेशन्स, पुणे यांचे मार्फत प्रकाशित केले आहे. या पुस्तकाचे एकत्रित बहुभाषीय इंग्रजी, हिंदी व उर्दू आवृत्ती प्रेस मीडिया( महाराष्ट्र व कर्नाटक )यांचेमार्फत प्रकाशित केले आहे. हे पुस्तक दृष्टिहीन विद्यार्थी किंवा व्यक्तींना ब्रेल- इंग्रजी भाषेत "अंडरस्टँडिंग द युनिव्हर्सिटी "उपलब्ध केले आहे. हे ब्रेल पुस्तक टेक्निकल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट ऑफ पूना ब्लाइंड मेन्स असोसिएशन ,पुणे यांचेमार्फत प्रकाशित केले आहे .कर्मचारी ते जागतिक पुरस्कार विजेता हा स्वतःच्या आयुष्यावर आधारलेला जीवन प्रवास "कॉफी टेबल बुक" मध्ये नमूद केला आहे .सध्या डॉ. निकाळजे मराठी -ब्रेल पुस्तक ,इंग्रजी- मराठी शब्दकोश, समीक्षा शासन निर्णयांची ,निवडणूक प्रक्रिया ,परदेशी व भारतीय शिक्षण प्रशासन व्यवस्था या विषयांवरील पुस्तक लिखाणामध्ये व्यस्त आहेत .काही विषय जर्मन, जपान ,डीजोंका(भूतान) इत्यादी परकीय भाषेत प्रकाशित करण्याच्या विचारात आहेत. 

              डॉ. निकाळजे यांना सेवानिवृत्तीस  काही महिने उरले असताना त्यांच्यात एवढी ऊर्जा कशी ?असा प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी त्यांच्या यशाची पंचसूत्री सांगितली. डॉ. निकाळजे म्हणाले, "देश आपल्यासाठी काय करतो? याच बरोबर आपण देशासाठी काय करतो? ही भूमिका देखील महत्त्वाची असते. कोणतेही काम करताना दुष्ट प्रवृत्ती, व्यक्ती, व्यवस्था ,अडचणी येतच असतात .परंतु नेमके उद्दिष्ट ठरले असल्यास हमखास यशाची गॅरंटी असते. माझ्या भावी पिढीसाठी मी पुस्तक रूपाने ज्ञानाचा छोटा झरा निर्माण केला आहे .त्यामुळे मी समाधानी आहे."

Post a Comment

Previous Post Next Post