कायनेटिक ग्रीन कंपनीची इलेक्ट्रिक चार्जिंग रिक्षा इलेक्ट्रा मोटर्स शोरूमचे उद्घाटन सहकार महर्षी कल्लाप्पाण्णा आवाडे (दादा) यांच्या हस्ते व जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे साहेब* यांच्या उपस्थितीत संपन्न



प्रेस मीडिया वृत्तसेवा : 

इचलकरंजी :  सातत्याने वाढत जाणारी प्रदूषणाची पातळी आणि त्याहून वेगाने वाढणारे इंधन दर या पार्श्वभूमीवर इलेक्ट्रिक वाहनांची सुविधा थोरात चौक, इचलकरंजी येथील *"इलेक्ट्रा मोटर्स शोरूम"* मध्ये उपलब्ध होणार आहे. अशा कायनेटिक ग्रीन कंपनीची इलेक्ट्रिक चार्जिंग रिक्षा इलेक्ट्रा मोटर्स शोरूमचे उद्घाटन सहकार महर्षी कल्लाप्पाण्णा आवाडे (दादा) यांच्या हस्ते व जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे साहेब* यांच्या उपस्थितीत संपन्न झाले. येथे इलेक्ट्रिक चार्जिंगच्या तीन प्रकारच्या मालवाहतुक व पॅसेंजर  गाड्या उपलब्ध होणार आहेत. त्यामध्ये केवळ ४० ते ५० पैसे इतक्या कमी रेंज मध्ये १ किलोमीटर पर्यंतचा वाहतूक खर्च असणार आहे. 

यावेळी माजी नगराध्यक्षा सौ. किशोरी आवाडे (वहिनी), उत्तमआण्णा आवाडे, डी. के.टी.ई  सचिव सौ. सपना आवाडे (वहिनी) ,जनता बँक संचालक स्वप्नीलदादा आवाडे, रवी आवाडे , सौ. वैशाली आवाडे (वहिनी),सौ. रेवती आवाडे (वहिनी), सौ. सना आवाडे (वहिनी), श्रीराम काबरा, नारायण काबरा, शिवम अग्रवाल, अरुण अग्रवाल, रुपेश मुंदडा , कैलाश मुंदडा , सुहास कांबळे, अक्षय आवळे, राम लोंढे, सुमित खोत  आदि उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post