देहूरोड़ बंगलोर मुंबई हायवे रस्त्यावर उभे राहून वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांवर कडक कारवाई करा ..... अर्चना ताई राऊत

प्रेस मीडिया वृत्तसेवा : अनवरअली शेख : 

पिंपरी चिंचवड़  : देहरोड  हद्दी मध्ये बंगलोर मुंबई हायवे रस्त्यावर   महिला उभे राहून खुलेआम दिवसा ढवळ्या वेश्या व्यवसाय करताना दिसत आहेत.  रस्त्यावर ऊभे राहून येणा जाणाऱ्या  वाहनचालकांना हाताने इशारे करून थांबून स्वतःकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत . मुख्य हायवे असल्यामुळे आयटी पार्क व कॉलेजला जाणारी महिला व तरुण विद्यार्थिनीची संख्या जास्त आहे .. वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिला मुळे या तरुणींना सुद्धा लज्जास्पद वागणुकीला सामोरे जावे लागत आहे. इतर लोक सुद्धा चुकीच्या नजरेने कामाला ये जा करणाऱ्या महिलांना बघतात . त्यामुळे  हा  चाललेला प्रकार कुठेतरी थांबला पाहिजे अशी मोठ्या प्रमाणात जनतेची मागणी होत आहे. 

या बाबतची तक्रार विकास नगर मध्ये राहणारे  नागरिकांनी ,समाज सेवकांनी व लोकांनी फेसबुक व्हाट्सअप , सोशल मीडियावर  फोटो व  विषय सुद्धा पोस्ट केले होते व त्याच्या बद्दल आवाज सुद्धा उचलला होता, पण आज पर्यंत त्याच्यावर कसलीही कारवाई झाली नाही. 

अर्चनाताई राऊत, महिला उपाध्यक्षा राष्ट्रवादी कांग्रेस पिंपरी चिंचवड़ यांना  या बाबत माहिती दिली असताना त्यांनी लगेच देहूरोडचे पोलिस निरक्षक यांना हा सर्व प्रकार सांगितला व पत्रक देऊन कायदेशीर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.

 या बाबत देहूरोड़ पोलिसांनी  तात्काळ ही विल्मभ न करता कारवाई करून या ठिकानी पून्हा हा प्रकार  होणार नाही असे आश्वासन अर्चना ताई राऊत यांना  देहूरोड पोलीस स्टेशनचे वरिष्ठांनी  दिले. 

Post a Comment

Previous Post Next Post