ब्रेकींग न्युज : घरगुती वापराच्या गॅस सिलेंडर मधून कमर्शियल सिलेंडर मध्ये भरण्याचा प्रकार..गॅसची चोरी करून ग्राहकांची फसवणूक.


सामान्य जनतेची  महागाईच्या काळात घोर फसवणूक; 



प्रेस मीडिया वृत्तसेवा : अनवरअली शेख : 

पिंपरी चिंचवड दापोडी येथे एका ठिकाणी एलपीजी गॅस घरगुती गॅस  चोरी प्रकार समोर अला आहे,घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरमधून गॅसची चोरी करून ग्राहकांची फसवणूक केली जात होती,  

सामान्य जनतेची  महागाईच्या काळात घोर फसवणूक.

 पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दापोडी येथे घरगुती गॅस सिलेंडरमधून कमर्शिअल गॅस सिलेंडरमध्ये गॅस भरून गॅसची चोरी होत आहे, अशी माहिती मिळाली. त्यानुसार सामाजिक सुरक्षा पथकाच्या पोलिसांनी कारवाई केली आहे. आरोपींनी गॅस एजन्सीकडून अतिप्रमाणात गॅस साठा घेऊन घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरमधून धोकादायकरित्या कमर्शिअल सिलेंडरमध्ये गॅस भरत गॅसची चोरी करून ग्राहकांची फसवणूक करत होते.सामाजिक सुरक्षा विभागाने दापोडी येथे छापा मारून कारवाई केली. घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरमधून गॅसची चोरी करून ग्राहकांची फसवणूक केल्याप्रकरणी नऊ जणांना अटक करण्यात आली आहे. तसेच तीन गॅस एजन्सी चालक व जागामालक यांच्याविरोधात देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई रविवारी दि. २६ सकाळी  दहाच्या सुमारास बॉम्बे कॉलनी, दापोडी येथे करण्यात आली.

गॅस रिफिल करणारा नागेंद्रपाल योगेन्‍द्रपाल सिंह  वय 28 , छोटू श्रीभगवान बघेल  वय 19, कामगार करतार छोटेलाल सिंह वय 26  ,राजेंद्रसिंग जोरसिंग सिंह वय 40 , टेम्पो चालक हरिकांत रौतान सिंह तोमर  वय 33 ,हरिशंकर धनीराम सिंह वय 22 ,आकाश शेर सिंह वय 19, रा. बॉम्बे कॉलनी दापोडी, देविदास तुळशीराम बिरादार वय 53, रा. शितोळे नगर, सांगवी, विष्णू बब्रुवान पवार वय 23, रा. जुनी सांगवी अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post