आता या चर्चांवर बबिताने पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे.प्रेस मीडिया वृत्तसेवा : 

 तारक मेहता का उल्टा चश्मा' ही मालिका गेल्या 13 वर्षापासून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. या मालिकेत काम करणाऱ्या कलाकारांनी प्रेक्षकांच्या मनामध्ये आपले एक वेगळे स्थान निर्माण केले आहे.याच मालिकेमध्ये बबिताची भूमिका करणारी मुनमुन दत्ता आणि टिपेंद्र उर्फ टप्पू गडाची भूमिका करणारा राज उनाडकट यांच्या अफेअरच्या चर्चा सोशल मीडियावर रंगत आहेत. आता या चर्चांवर बबिताने पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे.

मुनमुन दत्ता आणि राज उनाडकट यांच्या वयामध्ये 9 वर्षांचे अंतर आहे. दोघांच्या अफेअरच्या चर्चा रंगू लागल्यानंतर नेटकऱ्यांनी मुनमुन दत्ता हिला ट्रोल करायला सुरुवात केली होती. यामुळे भडकलेल्या मुनमुन दत्ता हिने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात तिने ट्रोलर्सला आणि अफेअरची चर्चा करणाऱ्यांना उत्तर दिलेसर्वसामान्य लोकांना उद्देशून लिहेलेल्या या पोस्टमध्ये बबिताने मला तुमच्याकडून चांगल्या अपेक्षा होत्या, मात्र कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही जी घाण पसरवून ठेवली आहे ती पाहून आपण किती मागसलेले आहोत हे दिसून येते असे म्हटले. फक्त तुमच्या मजेसाठी महिलांना सातत्याने त्यांचे वय आणि अफेअरच्या चर्चा रंगवून कमी दाखवले जाते. मग भलेही त्या व्यक्तीचे यामुळे मानसिक खच्चीकरण झाले तरी चालेल, असेही बबिताने आपल्या पोस्टमध्ये म्हटले.

ती पुढे म्हणाली, 13 वर्षापासून तुमचे मनोरंजन करत आहे, मात्र त्याच्या इज्जतीचा फालूदा करण्यास तुम्हाला 13 मिनिटही लागत नाही. समोरील व्यक्ती यामुळे डिप्रेशनमध्ये जावून आत्महत्या करण्याचे पाऊल उचलण्यापूर्वी थांबा आणि जरा विचार करा, तुमचे शब्द त्याला हे पाऊल उचलण्यास मजबूर तर करत नाहीय ना. आज मला स्वत:ला भारतीय मुलगी म्हणताना लाज वाटतेय.

दरम्यान, मुनमुन दत्ता ही 2008 पासून 'तारक मेहता का उल्टा चश्मा' या मालिकेत काम करत आहे, तर राज उनाडकट याची 2017 मध्ये एन्ट्री झाली. राजने भव्य गांधीला रिप्लेस करत या शोमध्ये एन्ट्री घेतली.

Post a Comment

Previous Post Next Post