ओला रिक्षा चालकांना मारहाण, दोन अनोळखी रिक्षाचालकांच्या विरोधात गुन्हा दाखल.



प्रेस मीडिया वृत्तसेवा : अनवरअली शेख : 

पिंपरी चिंचवड हिंजवडी आयटी सेक्टर विभाग प्रगतिशील शहरात  प्रवासी घेण्यावरून वाद घालून ओला रिक्षा चालकाला मारहाण केली. याप्रकरणी दोन अनोळखी रिक्षाचालकांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना सोमवारी दि. २७ पहाटे सव्वातीनच्या सुमारास भुमकर चौक हिंजवडी येथे घडली.

रिक्षावाल्यांची गुंडगिरी दिवसेंदिवस वाढतच आहे,माझा स्टॅण्ड, आमचा अएरिया इथे पेसेंजर भरू नको,ओला कॅन्सल कर,आम्ही आमच्या हिशोबाने तोंडी भाडं  सांगणार,तू ट्रिप कॅन्सल कर मंग ते प्रवासी नाईलाज आमच्या स्टॅण्ड वर येऊन रिक्षा तोंडी भाडं प्रमाणे रिक्षा करेल,तू भाहेरून आला आहे इथे धंदा करु नको,असा वाद नेहमीचं  प्रामाणिक मिटरवर चालणाऱ्या किंवा ओला रिक्षा चालकानां सहन करावा लागत आहे,

अर्जुन सोमनाथ ठोंबरे वय ३२, रा. खराडी, पुणे, मूळ रा. हिचरे, ता. करमाळा, जि. सोलापूर यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी दोन अनोळखी रिक्षाचालक यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे रिक्षाचालक आहेत. पुणे स्टेशन येथे प्रवासी घेण्यावरून आरोपींनी फिर्यादीला हटकले होते. फिर्यादीने ओला बुक करून पॅसेंजर घेतले. ‘आम्ही भुमकर चौक या भागात राहतो पॅसेंजर कॅन्सल कर आम्ही घेऊन जातो, असे आरोपी फिर्यादीला म्हणाले. मात्र फिर्यादीने भाडे कॅन्सल केले नाही. त्या कारणावरून आरोपींनी भुमकर चौक येथे येऊन फिर्यादीला शिवीगाळ केली. रिक्षातील दांडके व हाताने मारहाण करून फिर्यादीला जखमी केले. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post