यड्राव येथे राष्ट्रीय पोषण आहार अभियाणास प्रारंभ




 हातकणंगले तालुका प्रतिनिधी -  आप्पासाहेब भोसले : 

यड्राव (ता . शिरोळ ) येथे एकात्मिक बालविकास सेवा योजना अंतर्गत १ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर पर्यंत चालणाऱ्या राष्ट्रीय पोषण आहार अभियान कार्यक्रमाचे उदघाटन यड्राव गावचे सरपंच कुणालसिंह नाईक - निबांळकर व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले . तसेच राष्ट्रीय पोषण अभियान रॕली काढण्यात आली .        

       राष्ट्रीय पोषण आहार दरम्यान दररोज पोषण आहार रॕली , वृक्षारोपण , घोषवाक्ये स्पर्धा , परसबाग , कोविड लसीकरणबाबत जनजागृती , मातृवंदना सप्ताह , गर्भवती व स्तनदा मातांसाठी कोविड लसीकरण शिबीर , अॕनिमिया कॕम्प , पोषण आहार समुपदेशन , पाच मिनिटे योगाप्रोटो कॉल प्रशिक्षण , कुपोसीत मुलांना आहार वाटप असे विविध उपक्रम सदर कालावधीत राबविण्यात येणार आहेत . 

         सदर कार्यक्रमास ग्रा . प . सद्स्या सौ . वैशाली माने , रमेश माने , C H O डॉ . लिना बाबर , A N M वास्के सिस्टर , M P W किरण एरंडोले , सर्व अंगणवाडी सेविका , मदतनीस , आशावर्कस , माता , पालक उपस्थित होते . सदर कार्यक्रम जांभळी बीट सुपरवायझर अर्चना जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला . 

       सदर कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्तविक सौ . रुपाली हाळाळे यांनी केले , तर मनिषा ढोबळे यांनी आभार मानले .

Post a Comment

Previous Post Next Post