शिरोळ तालुक्यातील क्षारपड जमीनीच्या सर्वेक्षणासाठी ६० लाखांचा निधी मंजूर-राज्यमंत्री यड्रावकर



   तालुक्यातील 27 गावांतील क्षारपड जमिनीचे होणार सर्वेक्षण

      

ओमकार पाखरें :  शिरोळ: 

            शिरोळ तालुक्यातील क्षारपड जमिनीचे प्रमाण पाहता या जमिनींचा पोत सुधारण्यासाठीच्या योजना वेगवेगळ्या पद्धतीने राबवल्या जात आहेत, यासाठी यापूर्वीच महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागाचे मंत्री नामदार जयंत पाटील यांनी क्षारपड जमीन सुधारणा योजना साठी अर्थसहाय्य देणे बाबत ची घोषणा केली होती,  क्षारपड जमीन सुधारणा योजनां साठी राज्य शासनाच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देण्याबाबत सहकार्य व्हावे याबाबत आपण स्वतः आग्रही होतो, शिरोळ तालुक्यातील क्षारपड जमिनीची सद्यस्थिती, क्षारपड जमिनीचे असणारे एकूण क्षेत्र, आणि या जमिनींची सुधारणा करण्यासाठी येणारा खर्च याबाबतची विस्तृत माहिती वेळोवेळी आपण जलसंपदा मंत्री नामदार जयंत पाटील यांची भेट घेऊन दिली होती,  या जमिनीचे सर्वेक्षण व्हावे व जमीन सुधारण्यासाठी राज्य शासनाकडून आर्थिक मदत व्हावी अशी मागणी आपण १२  डिसेंबर २०२० रोजी लेखी निवेदनाद्वारे प्रत्यक्ष भेटून केली होती, याबाबत जलसंपदा मंत्री नामदार जयंत पाटील यांनी विभागाकडून शिरोळ तालुक्यातील क्षारपड जमिनी बाबतचा अहवाल मागवला होता, याचाच भाग म्हणून आयुक्त पुणे यांच्याकडून प्राप्त झालेल्या शिरोळ तालुक्यातील क्षारपड जमिनींच्या अहवालाच्या अनुषंगाने शिरोळ तालुक्यातील २७ गावांमधील क्षारपड जमिनीचे सर्वेक्षणासाठी लागणाऱ्या रुपये ६० लाखाच्या निधीला शासन मान्यता मिळाली असून लवकरच  सर्वेक्षणाच्या कामाची निविदा प्रसिद्ध होऊन सर्वेक्षणाचे काम प्रत्यक्ष सुरू होईल अशी माहिती सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी दिली आहे,

  शिरोळ तालुक्यातील दानोळी, कोथळी, उमळवाड, अर्जुनवाड, उदगांव, घालवाड, हसुर, कवठेसार, शिरटी, शिरोळ, शेडशाळ, कवठेगुलंद, गौरवाड, कुरुंदवाड, टाकवडे शिरढोण, नांदणी, अब्दुललाट, तेरवाड, बुबनाळ, आलास, मजरेवाडी,  बस्तवाड, हेरवाड, अकिवाट, दत्तवाड व दानवाड अशा २७ गावांमधील क्षारपड जमिनीचे सर्वेक्षण या योजनेअंतर्गत पूर्ण होणार आहे असेही राज्यमंत्री यड्रावकर यांनी म्हटले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post