लेटेस्ट न्यूज : दि. इचलकरंजी पॉवरलुम असो. इचलकरंजी येथे *आमदार प्रकाशआण्णा आवाडे यांची पत्रकार परिषद* पार पडली.






प्रेस मीडिया वृत्तसेवा : 

दि. इचलकरंजी पॉवरलुम असो. इचलकरंजी येथे *आमदार प्रकाशआण्णा आवाडे यांची पत्रकार परिषद पार पडली.

शिरोळ आणि हातकणंगले तालुक्यातील बहुतांशी गावाना महापुराचा फटका बसून एक महिना झाला मात्र *बोटावर मोजता येईल इतकी तुटपुंजी मदत वगळता राज्यसरकारने पूरग्रस्तांना कवडीची देखील मदत केली नाही.सन 2019 मध्ये तत्कालीन सरकारने पूरग्रस्तांना किती मदत केली होती, आणि आत्ताचे सरकार मदत करण्यासाठी कशी टाळाटाळ करत आहे हे आकडेवारी नुसार लवकरच समोर आणणार असल्याचा इशारा यावेळी आमदार प्रकाशआण्णा आवाडे यांनी दिला.* त्यामुळे सरकारने पूरग्रस्तांना दिलासा देणारी मदत तात्काळ केली नाही तर पूरग्रस्तांच्या मागण्यांसाठी संघर्ष करावाच लागेल.

कोरोनाची तिसरी लाट उद्भवण्याची शक्यता गृहीत धरुन जिल्हा नियोजनातून इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात मंजूर झालेला 200 जंबो सिलेंडरचा एक प्रकल्प गांधीनगर येथे हलविण्यात आला असून *इचलकरंजीला कायम दुजाभावाची वागणूक दिली जात असल्याचे पुन्हा एकदा उघड झाले आहे, असा आरोप आमदार प्रकाशआण्णा आवाडे यांनी केला.* इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात कसलीही कमतरता भासू देणार नाही. तसेच 42 कर्मचार्‍यांच्या समावेशनाचा प्रश्‍न येत्या आठवडाभरात मार्गी लागेल. याबाबतचा आदेश राज्य शासनाकडून येऊन ते कर्मचारी सेवेत रुजू होतील. व हे *रुग्णालय कोविड रुग्णालय न ठेवता अन्य आजारांवरील उपचार सुरु होणेबाबत आमदार प्रकाशआण्णा आवाडे यांचा पाठपुरावा सुरु असून 1 सप्टेंबरपासून तेथे सर्व उपचार सुरु होतील.

मागील दहा वर्षापासून आर्थिक अरिष्टातून मार्गक्रमण करीत असलेला वस्त्रोद्योग मागील दोन वर्षात कोरोना महामारी आणि महापूराच्या संकटाने मोडकळीस आला आहे. वस्त्रोद्योगाला उभारी मिळण्यासाठी शासनाने मदतीचा हात देण्याची गरज आहे. त्यासाठी *नव्याने काहीही मागणे नसून जे राज्य शासनाने जाहीर केले आहे त्याची अंमलबजावणी करावी. अन्यथा रस्त्यावरचा संघर्ष करावा लागेल,* असा इशारा आमदार प्रकाशआण्णा आवाडे यांनी दिला. यासह *यंत्रमागधारक व उद्योजकांचे वीज कनेक्शन तोडण्यात येऊ नये, या संदर्भात महावितरणच्या अधिकार्‍यांशी आमदार प्रकाशआण्णा आवाडे यांची चर्चा झाली असून त्यांनीही सहकार्याची भूमिका घेतली आहे.* 

याप्रसंगी ताराराणी पक्षअध्यक्ष प्रकाश दत्तवाडे, प्रकाश मोरे, प्रकाश सातपुते, सतिश कोष्टी, बाळासाहेब कलागते, राजगोंडा पाटील, बंडोपंत लाड, दत्तात्रय कनोजे, रफिक खानापुरे, प्रमोद महाजन, सोमा वाळकुंजे आदी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post