सरकार, पंतप्रधान मोदी आणि भाजपवर लोक उघडपणे बोलत असल्याने ते कसे थांबवावे यासाठी केंद्र सरकारच्या ट्वीटरवर कारवाई करण्याच्या हालचाली सुरू ...मंत्री नवाब मलिक




प्रेस मीडिया वृत्तसेवा :

मुंबई - जगभरात आणि देशभरात ट्वीटरच्या माध्यमातून केंद्र सरकार, पंतप्रधान मोदी आणि भाजपवर लोक उघडपणे बोलत असल्याने ते कसे थांबवावे यासाठी केंद्र सरकारच्या ट्वीटरवर कारवाई करण्याच्या हालचाली सुरू असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे.

कुठल्याही देशात कायद्यांतर्गत कुठलीही यंत्रणा वा आस्थापनांवर नियंत्रण करणं किंवा कारवाई करणं हा अधिकार असतो. परंतु केंद्र सरकार ट्वीटरसोबत का भांडतंय हा प्रश्न आहे. लोकांना स्पष्टपणे मत मांडायला ट्वीटरसारखा प्लॅटफॉर्म मिळाला आहे. त्यामुळे लोकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणणे योग्य ठरणार नाही, असे मत नवाब मलिक यांनी व्यक्त केले आहे.दरम्यान ईडीच्या माध्यमातून सुडबुद्धीने व राजकीय हेतूने एकनाथ खडसे यांची चौकशी सुरु आहे. एकनाथ खडसे हे या चौकशांना सामोरे जाताना यंत्रणेला सहकार्य करत आहेत. त्यांनी काही केलं नाही त्यामुळे ते घाबरत नाहीत, असंही नवाब मलिक म्हणाले.

यंत्रणांच्या माध्यमातून लोकांवर दबाव निर्माण करुन राजकीय गणितं बदलतील तर तो भाजपचा गैरसमज आहे, अशी टीकाही मलिक यांनी भाजपवर केली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post