प्रबोधन प्रकाशन ज्योती ' या मासिकाचा 'मे - जून २०२१ ' चा संयुक्त अंक आज १५ जून रोजी प्रकाशित झाला




प्रेस मीडिया वृत्तसेवा : 

 इचलकरंजी : नमस्कार ,समाजवादी प्रबोधिनी, इचलकरंजीच्या वतीने गेली बत्तीस वर्षे नियमितपणे प्रकाशित होणाऱ्या " प्रबोधन प्रकाशन ज्योती ' या मासिकाचा 'मे - जून २०२१ ' चा संयुक्त अंक आज १५ जून रोजी प्रकाशित झाला.लॉकडाऊन मुळे मे चा अंक प्रकाशित करणे अशक्य झाले. त्यामुळेअंक क्र.४०२ व ४०३ असा संयुक्त अंक आज प्रकाशित होतो आहे. सकस वैचारिक शिदोरी देणाऱ्या या मासिकाचे आपण वर्गणीदार वाचक असाल तर आनंदच आहे. नसाल तर त्वरित वर्गणीदार वाचक जरूर व्हा.वर्गणी ऑनलाईन भरू शकता.त्याचा तपशील सोबतच्या आवाहन पत्रात आहेच. तसेच याबाबत इतरांनाही सांगा ही नम्र विनंती..

Post a Comment

Previous Post Next Post