पंढरपूर येथे पोलिस हवालदार इकबाल शेख यांना 'शिवस्वराज्य पंढरी रत्न' पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला

 


प्रेस मीडिया वृत्तसेवा : 

सोलापूर  : पंढरपूर येथे पोलिस हवालदार इकबाल शेख यांना सोमवारी (ता. 14) विठ्ठल इन हॉलमध्ये 'शिवस्वराज्य पंढरी रत्न' पुरस्कार देऊन  गौरव करण्यात आला. यावेळी मान्यवर उपस्थित होते.

पंढरपूर येथे शिव स्वराज्य युवा संघटना, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने चतुर्थ वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमांमध्ये कार्यक्रमाचे अध्यक्ष सुधाकर महाराज इंगळे, भगीरथ दादा भालके चेअरमन विठ्ठल सहकारी श्रीमती साधनाताई भोसले नगराध्यक्ष पंढरपूर नगरपालिका, विक्रम कदम उपविभागीय पोलिस अधिकारी, पंढरपूर विभाग व संदीप मुटकुळे संस्थापक अध्यक्ष शिव स्वराज्य युवा संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते पोलिस हवालदार इकबाल अ. रशीद शेख यांना "शिवस्वराज्य पंढरी रत्न पुरस्कार" प्रदान करण्यात आला आहे. इकबाल शेख यांचे सहकारी मित्र, शालेय वर्गमित्र परिवार यांनी व पंढरपूर शहर पोलिस ठाणे प्रभारी अधिकारी अरुण पवार यांनीही पंढरपूर शहर पोलिस ठाणे येथे हवालदार इकबाल अ. रशीद शेख यांचा शाल व श्रीफळ हार देऊन सत्कार केला आहे.

हवालदार इकबाल शेख मनोगत व्यक्त करताना म्हणाले, 'विठ्ठल रखुमाई च्या पावन नगरीमध्ये माझा सत्कार माझ्या कर्मभूमी मध्ये झाला. आज पर्यंत मी पोलिस दलामध्ये केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल मला माझ्या कर्मभूमी मध्ये जेथे मी घडलो जेथे माझे शालेय व माध्यमिक शिक्षण पूर्ण झाले. जेथून मी पोलिस दलात सामील झालो अशा विठ्ठल रुकमाई च्या पावन नगरीमध्ये माझा सत्कार केल्याबद्दल मी शिव स्वराज्य युवा संघटना महाराष्ट्र राज्य व सर्व व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय प्रमुख पाहुणे यांचा मनःपूर्वक आभारी आहे. या सन्मानामुळे मला अजून जिद्दीने काम करण्याची ऊर्जा मिळाली आहे. यापुढेही मी पोलिस दलात उत्कृष्ट कामगिरी करून यशाचे शिखर गाठणे व सोलापूर जिल्ह्याचे नाव देशपातळीवर घेऊन जाईन अशी ग्वाही देतो. कार्यक्रमात उपस्थित माझे सर्व सहकारी मित्र, वर्गमित्र व सर्व सन्माननीय सदस्य यांचाही मी मनःपूर्वक आभार व्यक्त करतो.'

Post a Comment

Previous Post Next Post