शिरोळ पंचायत समितीवर राष्ट्रवादीचा झेंडा..पृथ्वीराजसिंग राजपूत :

शिरोळ :- शिरोळ पंचायत समितीच्या सभापती पदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला तालुकाध्यक्ष सौ.दिपाली संजय परीट यांची बिनविरोध निवड. विद्यमान सभापती कविता चौगुले यांनी आपल्या पदाचा १जून रोजी राजीनामा दिल्यानंतर सभापती पद रिक्त झाले होते.रिक्त झालेल्या सभापती पदाच्या निवडी करिता आज दि.१५/०६/२०२१ रोजी पंचायत समिती शिरोळ च्या सभागृहात निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार मा.सौ.अपर्णा मोरे - धुमाळ यांनी विशेष सभेचे आयोजन केले होते.

यावेळी सभापती पदा करिता राष्ट्रवादी कॉंग्रेस कडून दिपाली संजय परीट यांनी एकमेव अर्ज दाखल झालेने सदर ची निवडणूक ही दिपाली संजय परीट या बिनविरोध निवडून आल्या असे घोषित करण्यात आले. यावेळी तालुक्याचे गटविकास अधिकारी शंकर कवितके,पंचायत समिती उपसभापती सचिन शिंदे,माजी सभापती मल्लाप्पा चौगुले,सर्व पंचायत समिती सदस्य तसेच विविध पक्षांचे पदाधिकारी,कार्यकर्ते उपस्थित होते.

PRESS MEDIA

Chief Editor: Mehabub Sarjekhan

Post a Comment

Previous Post Next Post