पुढीलआठवड्यात पुण्याचा नंबर अनलॉकच्या दुसऱ्या टप्प्यात लागण्याची शक्‍यता , यातून बरेच निर्बंध शिथील होऊ शकतात.



प्रेस मीडिया वृत्तसेवा : 

 पुणे - पुढच्या आठवड्यात पुण्याचा नंबर अनलॉकच्या दुसऱ्या टप्प्यात लागण्याची शक्‍यता आहे. यातून बरेच निर्बंध शिथील होऊ शकतात. आणखी दोन दिवसांचा पॉझिटिव्हिटी रेट पाहून, हा निर्णय होण्याची शक्‍यता आहे. सध्या पुणे चौथ्या टप्प्यात आहे.

राज्यसरकारने सात जूनपासून अनलॉकचे पाच टप्पे ठरवले होते. त्यामध्ये करोनाची ऍक्‍टिव्ह रुग्णसंख्या, कार्यरत ऑक्‍सिजन बेडची स्थिती आणि बाधितांचा दर याचा समावेश होता. या नियमानुसार पुणे हे चौथ्या टप्प्यात बसणारे होते. गेल्या आठवड्यात पुण्यामध्ये बाधित दर हा सरासरी 6.11 टक्के होता. त्यामुळे पुणे तिसऱ्या टप्प्यातही येऊ शकले नाही.तिसऱ्या लेव्हलचा नियम हा 5 ते 10 टक्के बाधित दर असावा असे होते. तसेच ऑक्‍सिजन बेड 40 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त व्यापलेले असतील असे होते.

पुण्यामध्ये ऑक्‍सिजन बेडची संख्या ही 25 टक्‍क्‍यांच्या दरम्यान आहे. परंतु, बाधित दर जास्त होता. मात्र या आठवड्यात तो 4.7 ते 4.9 टक्‍क्‍यांच्या दरम्यान आला आहे. आणखी दोन दिवस शिल्लक असून, दोन दिवसांत बाधितांची संख्या कमी असल्यास आणि बाधित दर वर उल्लेखलेल्या प्रमाणे 5 टक्‍क्‍यांच्या आत असल्यास, पुणे चार वरून दुसऱ्या टप्प्यात जाऊ शकते.


या गोष्टी शिथिल होऊ शकतात…

50 टक्के क्षमतेने हॉटेल, मॉल, चित्रपटगृहे सुरू होऊ शकतात. सार्वजनिक जागा, खुली मैदाने, मॉर्निंग वॉक, सायकलींग सुरू राहू शकते. सरकारी आणि खासगी कार्यालये खुली होऊ शकतात. सायंकाळी 5 ते 9 कालवधीत क्रीडा प्रकार सुरू करू शकता, इनडोअर आणि आऊटडोअर चित्रपट शुटींग होऊ शकते.

सामाजिक, सांस्कृतीक कार्यक्रम 50 टक्के खुले, मॅरेजहॉल 50 टक्के आणि जास्तीतजास्त 100 लोकांच्या उपस्थितीला परवानगी, अंत्यविधीला सगळ्यांना उपस्थित राहता येईल, बैठका आणि निवडणुकांना 50 टक्के उपस्थिती, बांधकाम, कृषी कामे खुली होतील, इकॉमर्स सुरू राहील, जिम, सलून, ब्युतीपार्लर, स्पा 50 टक्के सुरू राहिल, सरकारी बस, आसनक्षमता 100 टक्के सुरू राहील, जिल्ह्याबाहेर जाण्यासाठी ईपासची गरज नसेल परंतु जेथे रेड झोन आहे तेथे जाण्याला ई-पास लागेल.

Post a Comment

Previous Post Next Post