उपमुख्यमंत्री अजित पवार यांची राम खांडेकर यांना श्रद्धांजली



प्रेस मीडिया वृत्तसेवा : 

मुंबई, दि. 9 :- माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव यांचे विशेष कार्य अधिकारी, पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण साहेबांचे खाजगी सचिव म्हणून प्रदीर्घ काळ प्रशासकीय जबाबदारी सांभाळलेल्या श्री. राम खांडेकर साहेबांच्या निधनाबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दु:ख व्यक्त केले आहे. पंतप्रधान आणि मुख्यमंत्री कार्यालयात अनेक वर्षे काम करणारे अधिकारी म्हणून कितीतरी महत्वाच्या निर्णयांमध्ये खांडेकर साहेबांचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहभाग होता. देशावर प्रभाव टाकणाऱ्या अनेक निर्णयप्रक्रियांचे ते साक्षीदार होते. त्यांच्या निधनानं महाराष्ट्राच्या, देशाच्या आजवरच्या गौरवशाली वाटचालीचा साक्षीदार काळाच्या पडद्याआड गेला आहे. राजकीय नेतृत्वाला यशाचं शिखर गाठता यावं, राजकीय नेतृत्वाचं काम प्रभावी होत रहावं, यामाध्यमातून राज्याचं, देशाचं, लोकांचं भलं व्हावं, या विचारानं, ध्येयानं राम खांडेकर साहेबांसारखे अधिकारी अहोरात्र झपाटून काम करत असतात. प्रशासकीय सेवेत त्यांचं मोलाचं योगदान असतं. त्यांचं निधन ही प्रशासकीय चळवळीचीही मोठी हानी आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. भाषा विषयाचे अभ्यासक व लोकप्रिय साहित्यिक म्हणून राम खांडेकर यांनी केलेल्या कार्याचाही उपमुख्यमंत्र्यांनी गौरवपूर्ण उल्लेख केला.


Post a Comment

Previous Post Next Post