नैतिकता विकणाऱ्यांनी नैतिकतेवर बोलल की लोकं 'चंपा' म्हणतात... अमोल मिटकरी



मुंबई | गेल्या काही दिवसांपासून उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांच्यात चांगलीच शाब्दिक चकमक पाहायला मिळत आहेे. चंद्रकात पाटील यांनी अजित पवारांनी केेलेल्या टीकेला जोरदार उत्तर दिलं होतं, त्यानंतर आता चंद्रकांत पाटलांवर खोचक टीका करत 'दादा आणि दादा' यांच्यातील शाब्दिक वादात राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी उडी घेतली आहे.

दिल्लीतील चौकीदारचं लक्ष देशाच्या तिजोरीवर आणि गल्लीतल्या ठेकेदारचं लक्ष सिल्वर ओकच्या ड्राव्हरवर आहे. करवीरच्या खजिन्यावर असाच डोळा असेल म्हणुन करवीरकरांनी हाकललं होतं. त्यामुळं नंतर कोथरूड शोधावं लागलं, अशी खोचक टीका अमोल मिटकरी यांनी केली आहे.त्याचबरोबर नैतिकता विकणाऱ्यांनी नैतिकतेवर बोलल की लोकं 'चंपा' म्हणतात, असा टोला देखील त्यांनी चंद्रकांत पाटील यांना लगावला आहे.

शरद पवारांच्या ड्रॉव्हरमधून 54 आमदारांची यादी चोरून राज्यपालांना सादर करणं कोणत्या नैतिकतेत बसतं? तरीही ते शहाणपणा शिकवतात?, असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी केला होता. अजित पवार यांनी आपली चेष्टा करण्याचा प्रयत्न केला. आता तुम्ही बोलला तर मला बोलावं लागणार. कारण वाराला प्रतिवार करणं ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी हे आपल्याला शिकवलं आहे. असं चंद्रकांत पाटील म्हणाले होते.

दरम्यान, चंद्रकांत पाटील यांचं मानसिक संतुलन बिघडलं आहे. पाण्याविना मासे तडफडतात तशी राज्यातील भाजप नेत्यांची अवस्था आहे. औरंगजेबाला ज्याप्रमाणे स्वप्नात शिवाजी महाराज दिसायचे. त्याप्रमाणेच चंद्रकांत पाटील यांना स्वप्नात केवळ अजित पवारच दिसतात, अशी टीका मिटकरी यांनी केली होती.

Post a Comment

Previous Post Next Post