राजकिय नेते , श्रीमंत , आमदार ह्यांना लॉक डाउनचा काही फरक पडत नाही




सर्व सामान्यांच्या प्रतिक्रिया.



राजकिय नेते , श्रीमंत, आमदार ,खासदार यांना लॉकडाऊनचा काही फरक पडत नाही सर्व सुख सोयींनी व खूप पैशांनी ते खूपच श्रीमंत आहेत त्यांनी आणखी 50 वर्षे सलग लॉक डाउन केला तरी तिळ मात्र त्यांना फरकच पडत नाही परंतु त्या 50 मधील केवळ 5 दिवसाच्या लॉक डाउन ने सामान्य व गरीब लोक क्षण क्षण मरत आहे झुरत आहे व अतिशय कंगाल होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे ,,,,,,,,आणि एकीकडे 80 वय वर्ष असलेला वृद्ध ,गर्भवती स्त्री व 4 वर्ष असलेला मुलगा सुद्धा कोरोनातून बरा होत आहे मग 30 ते 40 वयोगटातील धडधडित तरुण कसा मरत आहे नेमके हॉस्पिटलमध्ये घडत तर काय आहे इंजेक्शन वर इंजेक्शन देऊन ,,,,


माणसांना यम सदनी पाठवाचे ठरवले आहे हे अजून कोणालाही न उलगडलेले कोडे आहे निम्मी अर्धी यंत्रणा security दवाखान्यात जर लावली असती तर हॉस्पिटलमधील सर्व गैरव्यवहार व गैरवर्तन तसेच लुटमारी सरकार ला समजली असती security रोड नाके सीमा भागात आहे हॉस्पिटलमधील एखादी व्यक्ती लाखाचे बिल भागवून सुद्धा दगावली की सरकार जागे होते सांत्वन करण्याकरिता मग लगेच निर्णय पुन्हा लॉक डाउन कडक तो पर्यंत सामान्य माणूस लाल भडक त्यांला दिसते फक्त स्मशानभूमी कडील सडक.

Post a Comment

Previous Post Next Post