चांगली बातमी : पुणे गेल्या 24 तासांत बाधितांची संख्या 931



पुणे : करोना बाधितांची संख्या गुरूवारी पुन्हा एक हजारच्या आत आली असून, गेल्या 24 तासांत बाधितांची संख्या 931 झाली आहे. तर 66 जणांचा मृत्यू झाला असून, त्यातील 24 जण पुण्याबाहेरील आहेत आजपर्यंत 4 लाख 63 हजार 103 जण बाधित सापडले असून, त्यातील 4 लाख 40 हजार 173 जण बरे झाले आहेत. दिवसभरात 1 हजार 76 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

बाधितांमध्ये 15 हजार 43 सक्रीय रुग्ण असून, त्यातील 1 हजार 328 जणांची प्रकृती गंभीर आहे. 4 हजार 360 रुग्ण ऑक्‍सिजनवर असून, ही संख्या मात्र कमी झाल्याचे दिसून येत आहे. आजपर्यंत 7 हजार 887 जणांचा मृत्यू झाला आहे. दिवसभरात 12 हजार 226 संशयितांची स्वॅबटेस्ट करण्यात आली आहे, असे आरोग्य विभागाने सांगितले.

Post a Comment

Previous Post Next Post