पुणे : महिन्याहून अधिक काळ सुरु असलेल्या लॉक डाऊन मुळे भटकंती करून उपजीविका करणाऱ्या भटक्या-विमुक्त जमातींवर उपासमारीची वेळ आली असून राज्य शासनाने आर्थिक मदत द्यावी ,अशी मागणी पुणे शहर भारतीय जनता पक्षाच्या भटके -विमुक्त आघाडीने निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. या आघाडीचे शहराध्यक्ष राजेश धोत्रे तसेच बंडू जायभाये,भगतसिंग कल्याणी,शिवपुत्र क्षत्री,शक्तिसिंग कल्याणी,शैलेश काची,भीम देवकाते यांनी हे निवेदन दिले.
कोरोना साथीच्या मुळे वडार,गोसावी,गारुडी,घिसाडी,कटबू,लोहार,गोंधळी,जोशी,डमरूवाले,कोल्हाटी,मसणजोगी,नंदीवाले,शिखलकर,वासुदेव,भोई,धनगर,वंजारी,बंजारा या जमातींवर उपासमारीची वेळ आली आहे.सरकारने या घटकांसाठी कोणतीही मदत जाहीर केलेली नाही.त्यांची उपासमार टाळण्यासाठी सरकारने तातडीने आर्थिक मदत जाहीर करावी,अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या मार्गदर्शनानुसार मंगळवारी हे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयात देण्यात आले.