खतांच्या दरवाढीने शेतकरी आर्थिक संकटात



 

दत्तवाड : पृथ्वीराजसिंग राजपूत : 

 दत्तवाड :  जगाचा पोशिंदा म्हणून शेतकऱ्याकडे पाहिले जाते . कोरोना काळात फक्त शेतकऱ्यांमुळे देशात कोठेही अन्नधान्य , फळे , भाज्या यांची कमतरता जाणवली नाही . पण आज हाच शेतकरी कोरोनामुळे आर्थिक दृष्ट्या कमकुवत होत चालला आहे . रासायनिक खतांच्या मध्ये भरमसाठ वाढ होत असल्याने शेतकरी पूर्ण पणे आर्थिक संकटात सापडला जात आहे शेती मालाला दर हा शेतकरी ठरवत नसून तो फक्त व्यापारीवर्ग दर ठरवितो यामुळे शेतकऱ्याला म्हणावे असे नफा मिळत नाही

   २०२० पासून कोरोनाने देशात महामारी सुरू झाले आहे . बाजारपेठा ठप्प झाल्याने शेतकऱ्यांच्या मालाला योग्य किंमत मिळत नसल्याने पिकामध्ये जनावरे सोडण्याचे काही प्रकार सध्या घडत आहेत . तसेच उत्पादन वाढीसाठी रासायनिक खते वापरली जातात , मात्र शेतीसाठी येणारा खर्च वजा करुन शेतकऱ्यांना काही फायदा होत नसल्याचेही दिसून येत आहे . तसेच डिझेल दरवाढ मुळे शेतकरी वर्गाला ही कोरोनाचे संकट मोठ्या प्रमाणात फटका बसत आहे . महापूर तसेचरासायनिक खतांची दरवाढ झाल्याने शेतकरी वर्गाचे कंबरडे मोडण्याची भूमिका केंद्र शासनाने घेतली आहे अशी नाराजी शेतकरी वर्गातून होत आहे .

Post a Comment

Previous Post Next Post