डॉक्टरांच्या रुपात देव भेटला कोविड सेंटर मध्ये... सौ. जास्मिन सर्जेखान. तासगाव कोविड सेंटर येथील सुखद घटणा..





हातकणंगले तालुका प्रतिनिधी - आप्पासाहेब भोसले               

कोरोना उद्रेकाने संपुर्ण  महाराष्ट्रात धडकी भरवणार्या घटना घडत आहेत.तसेच काही सकारात्मक घटना सुद्धा घडत आहेत.   नुकतीच एक घटना तासगाव तालुक्यात घडली आहे. येथील कोविड सेंटरमध्ये  अवघ्या पंधरा दिवसाचं बाळ असलेल्या जस्मिन सर्जेखान  यांना  तासगांव कोविड सेंटर मधिल डॉक्टरांच्या पथकाने जीवदान दिल्याची घटना समोर आली आहे. देव स्वर्गात असतो,दगडात भेटतो देव देवळात भेटतो असे म्हणतात इथे या जास्मिन सर्जेखान  यांना कोविड सेंटरमध्ये डॉक्टरांच्या रुपातच  देव भेटला.  सौ. जस्मिन सर्जेखान यांनी  कोविड सेंटर मधून स्वहस्ताक्षरात पत्र लिहून काम करणाऱ्या डॉक्टरांच्या पथकाचे आभार मानले आहे. सौ. जस्मिन यांना उपचारानंतर घरी सोडण्यात  आले . 

         तासगाव येथील तंत्र निकेतन कोविड 19 केअर सेंटर सुरु आहे.या कोविड सेंटर मधे 21 एप्रिल रोजी  सौ. जस्मिन सर्जेखान यांना कोरोना उपचारासाठी दाखल झाली होती. तेव्हां ICU मध्ये त्यांच्या डोळ्यां देखत तीन पेशंटानी आपला जीव गमावला ही सर्व दृष्ये पाहून त्या रात्री त्यांच्या मनात नाही ते विचार घोळू लागल्यामुळे त्यांनी आपल्या सर्व नातेवाईकांना मोबाईल वरुन मॕसेज करुन सर्वांची माफी मागितली.ICU मधील दृश्ये पाहून जगण्याची आशा कमी जाणवू लागले.आणि रात्रभर रडणारया जस्मिन यांना त्यांच्या डोळ्यासमोर 15 दिवसाच बाळ रात्रभर दिसू लागले. दुसऱ्या दिवशी सकाळ मात्र नवी आशा घेउन उजाडली. डॉ.शिवाजी पाटील यांनी  जस्मिन यांना तू नक्की तुझ्या बाळाला पाहशील असा धीर देऊन उपचार सुरु केले. डॉ.प्रविण शिंदे,डॉ.सुमित जाधव,डॉ.गौरव यांनी प्रयत्नांची पराकाष्टा करुन  जस्मिन ला  जीवदान दिले. देव देवळात,दगडात नाही याची प्रचिती या जस्मिनला आली. वाढती रुग्ण संख्या, बेड उपलब्ध नाही,डोळ्यादेखत  होणारे मृत्यू या अतिशय बिकट परिस्थितीत काम करणारे डॉक्टर,कर्मचारी,जीवाची बाजी लावत काम करत आहेत.या जस्मिन यांनी पत्रातून त्यांच्या बद्दल व्यक्त होणारी कृतज्ञता ही वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या डॉक्टर ,व कर्मचारी यांचे मनोधैर्य वाढवणारी नक्की ठरणार आहे यात शंका नाही. माझ्या प्रकूर्ती चांगली व्हावी या साठी सर्वांनी दिवस रात्र माझ्यासाठी दुआ केली त्यामुळेच मी आज आपल्या सर्वांच्या समोर उभी आहे.असे  सौ.जस्मिन सर्जेखान प्रेस मीडियाशी बोलताना सांगितले.

Post a Comment

Previous Post Next Post