राज्य पोलीस दलात उल्लेखनीय आणि वैशिष्टपूर्ण सेवेसाठी दिली जाणारे पोलीस महासंचालक सन्मान पदक पुण्याचे पोलिस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, पोलीस उपायुक्त पौर्णिमा गायकवाड यांच्यासह 25 जणांना जाहीर करण्यात आले



पुणे :  दिनांक :  01.05.2021.  राज्य पोलीस दलात उल्लेखनीय आणि वैशिष्टपूर्ण सेवेसाठी दिली जाणारे पोलीस महासंचालक सन्मान पदक पुण्याचे पोलिस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, पोलीस उपायुक्त पौर्णिमा गायकवाड यांच्यासह 25 जणांना जाहीर करण्यात आले आहे. 1 मेच्या पार्श्वभूमीवर दरवर्षी पोलिस दलात केलेल्या उल्लेखनीय सेवेबद्दल पोलीस महासंचालकांकडून सन्मानचिन्ह जाहीर केले जाते.


यावर्षी राज्यातील 779 पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना सन्मानचिन्ह जाहीर झाले आहे. सन्मानचिन्ह जाहीर झालेले पुणे पोलिस दलातील अधिकारी डॉ. रवींद्र शिसवे (पोलिस सहआयुक्त), पौर्णिमा गायकवाड (पोलिस उपायुक्त), लक्ष्मण बोराटे (सहायक पोलिस आयुक्त), वरिष्ठ पोलीस निरीक्षक- प्रतिभा जोशी, वैशाली चांदगुडे, प्रताप मानकर पोलीस उपनिरीक्षक- अक्षयकुमार गोरड, अरविंद चव्हाण, शिवदास गायकवाड, पोलिस कर्मचारी- प्रल्हाद भोसले, राजेंद्र जगताप, दिलीप काची, दत्तात्रय शेळके, विजय भोंग, प्रदीप शितोळे, अंकुश माने, किरण देशमुख, कृष्णा बढे, विजय कदम, यशवंत खंदारे, अमोल नेवसे, सुरेंद्र जगदाळे, मनोज जाधव, मंगेश बोऱ्हाडे, हेमलता घोडके यांचा सन्मान करण्यात आला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post