कठोर निर्बंधांचे उत्तम परिणाम आठ दिवसात दिसू लागला.



कोरोनाच्या दुसऱया लाटेत झपाटय़ाने वाढणारी रुग्णसंख्या रोखण्यासाठी 22 एप्रिलपासून राज्यभरात लागू करण्यात आलेल्या कठोर निर्बंधांचे उत्तम परिणाम आता मुंबईत दिसत आहेत गेल्या आठ दिवसांत मुंबईत रुग्ण दुपटीचा कालावधी दुप्पट होऊन 80 दिवसांवर गेला असून चाचण्यांच्या प्रमाणात बाधित रुग्ण आढळण्याचे प्रमाण 18.24 टक्क्यांवरून 9.94 टक्क्यांवर खाली आले आहे शिवाय रुग्णसंख्या घटल्याने चाळी झोपडपट्टय़ा आणि इमारतींमधील तब्बल 400 ठिकाणे निर्बंधमुक्त झाली आहेत .


मुंबईत कोरोना रुग्णसंख्येने एप्रिलमध्ये उच्चांकी नोंद करीत पालिकेसह मुंबईकरांचे टेन्शन वाढवले.1 एप्रिल रोजी रुग्णसंख्या 9242, 2 एप्रिल रोजी 9615 तर 3 एप्रिल रोजी उच्चांकी नोंद होत 11 हजार 573 इतकी नोंदवली गेली. यानंतर सलग 15 दिवस सुमारे 9 ते 10 हजार रुग्णसंख्या नोंदवली जात होती. मात्र यानंतर पालिकेने केलेल्या उपाययोजनांमुळे मुंबईत रुग्णसंख्या उतरतीला लागली असून चार हजारांपर्यंत नोंदवली जात आहे. विशेष म्हणजे दररोज 40, 45 ते 50 हजार चाचण्या होत असतानाही रुग्णसंख्या घटत आहे. 30 एप्रिल रोजी 44 हजार चाचण्या झाल्या असताना 3871 इतकी नोंदवली गेल्याची माहिती पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी दिली.

अशी झाली सुधारणा

दिनांक चाचण्या बाधित प्रमाण

1 एप्रिल 44,328 9242 20.85

5 एप्रिल 47,922 10458 21.82

10 एप्रिल 52,159 10387 19.91

15 एप्रिल 50,533 9316 18.44

20 एप्रिल 47,270 8185 17.32

25 एप्रिल 28,328 4336 15.31

29 एप्रिल 43,525 4328 9.94

85 टक्के रुग्णांमध्ये लक्षणे नाहीत

मुंबईत 30 एप्रिल रोजी 44 हजार चाचण्यांमध्ये आढळलेल्या 3871 बाधितांपैकी 85 टक्के रुग्णांमध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणे नसल्याची माहिती पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी दिली. देशातील सर्वाधिक चाचण्या मुंबईत होत असून पॉझिटिव्हीटीच्या प्रमाणात एक आकडी प्रमाण असणारे मुंबई एकमेव शहर असल्याचा दावाही आयुक्तांनी केला. पालिकेकडे सध्या 5725 बेड रिक्त असल्याचेही आयुक्तांनी स्पष्ट केले.

आठ दिवसांत 400 ठिकाणे निर्बंधमुक्त

मुंबईत 21 एप्रिल रोजी चाळी - झोपडपट्टय़ांमध्ये 114 कंटेनमेंट झोन होते त्यामुळे 1.24 लाख घरांमधील 5.66 लाख रहिवासी नियमांच्या कचाटय़ात सापडले होते तर इमारतींच्या मायक्रो कं टेनमेंट झोनमध्ये 1198 आणि इमारतींमधील 10,975 मजले सील होते .

29 एप्रिल रोजी मुंबईत चाळी - झोपडपट्टय़ांमध्ये 115 कं टेनमेंट झोन इमारतींमध्ये 1101 मायक्रो कं टेनमेंट झोन आणि इमारतींचे 10 हजार 686 मजले सील आहेत यानुसार गेल्या आठ दिवसांत एकूण प्रतिबंधित क्षेत्रांच्या संख्येत 386 ने घट झाली आहे रुग्णसंख्या घटत असल्याने प्रतिबंधित क्षेत्रेही घटत आहेत .

Post a Comment

Previous Post Next Post