स्वारगेट येथील पीएमपीएल स्थानकात बसमध्ये बसून आंदाेलन ,. खासदार गिरीश बापट यांच्यासह कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन स्वारगेट पाेलीस स्थानकात नेले. पुणे - काराेनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील पीएमपीएल सेवा सात दिवसांकरिता बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. या निर्णयास भारतीय जनता पक्षाने विराेध दर्शवला असून खासदार गिरीश बापट, भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्यासह भाजप नगरसेवकांनी स्वारगेट येथील पीएमपीएल स्थानकात बसमध्ये बसून आंदाेलन केले. अखेर पाेलिसांनी बापट यांच्यासह कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन स्वारगेट पाेलीस स्थानकात नेले.

बापट म्हणाले, पीएमपीएल बस ही पुण्याची रक्तवाहिनी असून ती बंद न करता सुरु केली पाहिजे. काराेनाचे संदर्भात शासनाला संपूर्ण सहकार्य आम्ही करत आहे. रुग्णालय, रुग्णवाहिका, आराेग्य कर्मचारी यांना वेळाेवेळी मदत करत आहे.काराेना नियमांचे पालन करुन बससेवा सुरु केली पाहिजे. बस बंद करण्याचा निर्णय शासनाचा एकतर्फी असून नागरिक, प्रशासकीय कर्मचारी यांची त्यामुळे अडचण हाेत आहे. काराेनाला हटविण्याकरिताच आम्ही रस्त्यावर उतरुन काम करणारे कार्यकर्त आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना सांगा, आम्ही बंगल्यात बसून काम करणारे कार्यकर्ते नाही, ही बाब त्यांना माताेश्रीत बसून कारभार करत नाही. वाडया-वसत्या, वाॅर्डात फिरुन काम आम्ही करताे, असे बापट यांनी म्हंटले आहे.

Post a comment

0 Comments