इचलकरंजी गावभागातील रस्ते डांबरीकरणास सुरुवात नगराध्यक्षा ॲड सौ अलका स्वामी यांच्या कडुन पाहणी.

 



  इचलकरंजी/प्रतिनिधी -

प्रदीर्घकाळापासून गावभागातील प्रलंबित महाराणा प्रताप चौक ते ढोले पाणंद व हजरत मख्तुम दर्गा ते महाराणा प्रताप चौक या रस्त्यांचे रुपडे अखेर पालटले आहे. या दोन्ही रस्त्यांच्या डांबरीकरण कामाला सुरुवात झाली असून त्याची नगराध्यक्षा ॲड  सौ. अलका स्वामी यांनी प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली.

गावभागातील विविध रस्ते प्रदीर्घकाळापासून दुरुस्त न केल्याने या रस्त्यांची दूरवस्था झाली होती. या संदर्भात भागातील लोकप्रतिनिधींसह नागरिकांकडून विविध मार्गाने आंदोलन छेडत रस्ते दुरुस्तीची मागणी करण्यात येत होती. त्यानुसार लोकशाहिर आण्णाभाऊ साठे नागरी दलित वस्ती सुधार योजना अंतर्गत महाराणा प्रताप चौक ते ढोले पाणंद व हजरत मख्तुम दर्गा ते महाराणा प्रताप चौक या रस्त्यांचे डांबरीकरण करण्यात येत आहे. अनुक्रमे 8.60 लाख व 8.20 लाख खर्चाचे अंदाजपत्रक आहे. या दोन्ही रस्त्यांची प्रदीर्घकाळापासून असलेली दूरवस्था संपल्याने भागातील नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे.

याप्रसंगी नगरसेविका सौ. दिपाली बेडक्याळे, सौ. स्मिता तेलनाडे, उपअभियंता निवृत्ती गवळी, शशिकांत नेजे, नागेश पाटील, रविंद्र पाटील, रोहन कुंभार, मक्तेदार प्रविण बेलवळे आदी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post