तारदाळ खोतवाडी यड्राव फाटा परिसरात विकेंड लाॕकडाऊनला चांगला प्रतिसाद





हातकणंगले तालुका प्रतिनिधी - आप्पासाहेब भोसले 

कोरोणाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्य सरकारने लागू केलेल्या वीकेंङ लाँकङाऊनला तारदाळ खोतवाडी,यड्राव फाटा परिसरात नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिल्याचे चित्र होते. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी  सरकारने लागू केले विकेंड लाॕकडाऊन मुळे ठिकठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

 अत्यावश्यक सेवा वगळता सर्वांनी आपले व्यवहार बंद ठेवले.

सकाळ पासूनच चौकात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.तसेच  विनाकारण रस्त्यावर  फिरणार्यां लोकांची चौकशी करून दंड करण्यात आला तर विमा-मास्क दुचाकीस्वारांवरती कारवाई करण्यात आली व्यापारी व नागरीकांनी आपले सर्व व्यवहार बंद ठेवून विकेंड *


हातकणंगले तालुका प्रतिनिधी - आप्पासाहेब भोसले

कोरोनामुळे शहापूर गावची प्रसिद्ध म्हसोबा देवस्थान यात्रा रद्द.    

शहापूर गावची ग्रामदैवत व पंचक्रोशीतील नागरिकाचे श्रद्धास्थान असलेले श्री म्हसोबा देवाची यात्रा पोलिस  प्रशासनाच्या सूचनेनुसार रद्द करण्यात आली. 

म्हसोबा देवस्थान ची यात्रा दिनांक २० एप्रिल रोजी होणार होती. परंतु कोरोना महामारी व वाढती रुग्ण संख्या या सर्व गोष्टींचा विचार करून *शहापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यादव साहेब व उदयसिंग पाटील (बांधकाम सभापती)* यांनी शुक्रवारी म्हसोबा देवस्थान येथे बैठक आयोजित केली होती.                                                                                                              सदर बैठकीत प्रसंगी शहापुरातील सर्व नगरसेवक, पोलीस प्रशासन ,सामाजिक कार्यकर्ते, म्हसोबा देवस्थानचे प्रमुख मान्यवर , नागरिक उपस्थित होते.

या बैठकीमध्ये म्हसोबाची  मानाची सासन काठी जागेवरच उभी करण्यात येईल. लक्ष्मी मंदिर शहापूर येथे विधिवत पालखीचे जागेवर पूजा करण्यात येईल.तसेच म्हसोबा देवस्थान येथे विधिवत सोमवारी रात्री बारा वाजता अभिषेक प्रमुख पुजारी यांची उपस्थित करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांना सासनकाठी, पालखी,अभिषेक, दर्शन, काही करता येणार नाही .अशा सक्त सूचना बैठकीमध्ये करण्यात आल्या. नागरिकांनी यात्रेदिवशी देवस्थानकडे कोणी येण्याची नाही अन्यथा कडक कारवाई करण्यात येणार आहे. *तरी नागरिकांनी व गावकऱ्यांनी पोलीस प्रशासनाच्या सूचना मान्य केल्या. व त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे ठरविले आहे.*                                   ज्यांना कोणाला नैवेद्द करण्याचा आहे. त्यांनी आपापल्या घरीच नैवेद्य करावा व घरातूनच नैवेद्य दाखवावा. *मंदिरकडे येण्याची नाही. आल्यास दंड करण्यात येईल असेही ठरविण्यात आले. त्यामुळे संपूर्ण जगावर आलेले या संकटावर मात करण्यासाठी कायमच शहापूर वासियांचे  सहकार्य असेल, असा शब्द पोलीस प्रशासनाला देण्यात आला.

 यावेळी नगरसेवक किसन शिंदे ,भाऊसो आवळे ,(शिक्षण सभापती) नितीन कोकणे ,प्रधानजी माळी ,दादासो भाटले, रविंद्र कांबळे, रणजीत अनुसे ,पोलीस पाटील विलास कांबळे, दिलीप पाटील( दादा ),रमेश पाटील,दशरथ कांबळे,सुनील कांबळे, आप्पासाहेब कांबळे ,भालचंद्र उगळे,यशवंत उगळे, भिकाजी देशिंगे, आनंदा देशिंगे,पैलवान बडा उगळे,सुमित नेमिष्टे ,पिंटू कांबळे,बबलू कांबळे, रफिक मुजावर, अशोक वाजे,कुबेर लाटवडे, रतन वाजे,प्रताप मस्के,बजरंग उगळे,यासह देवस्थान शहापूर ग्रामस्थ व पुजारी उपस्थित होते. चांगला प्रतिसाद दिला.

Post a Comment

Previous Post Next Post