खोतवाडी संगमनगर येथे युवकाचा संशयास्पद मृत्यू
             

 (हातकणंगले तालुका प्रतिनिधी - आप्पासाहेब भोसले)  


खोतवाडी संगमनगर परिसरातील  असणाऱ्या पार्वती इंडस्ट्रीयल इस्टेट च्या मेन गेट समोरील असणाऱ्या संगमनगर येथील कोल्हापूरी धाबा जवळ एका युवकाचा मृतदेह आढळून आला. हा घातपात आहे की अपघात की खून हे समजू शकले नाही. या युवकाचे नाव अमीन गलवाल असे आहे . संबंधित अमीन हा इचलकंरजीतील भोनेमाळ येथील असल्याचे समजते . अमीन यास त्याच्या मित्राने जीवे मारण्याची धमकी दिली  असल्याचे घटनास्थळी समजले.   अमीन याच्या अंगावर मारलेले वर्ण आहेत त्यामुळे या घटनेचा वेगवेगळ्या पद्धतीने तर्क लावले जात आहेत. ही माहिती आमीन याच्या घरी व नातेवाईक याना समजताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली अमीन यास या अवस्थेत पाहून पत्नी व नातेवाईक यांनि आक्रोश केला. या घटनेचा अधिक तपास शहापूर पोलीस स्टेशन करत आहे.. घटनास्थळी डी वाय एस पी बी बी महामुनी यांनी भेट दिली व तपासा संबंधित सूचना केल्या.

Post a comment

0 Comments