छत्रपती शिवाजी मार्केट'ला आज पहाटे लागली भीषण आग , आगीत मार्केट मधील मटण, चिकन, मासे इत्यादी सर्व दुकाने जळून खाक झाली
पुणे - पुणे शहरातील कॅम्प येथील 'छत्रपती शिवाजी मार्केट'ला आज (दि. १६) पहाटे भीषण आग लागली आहे. या घटनेत मार्केट मधील मटण, चिकन, मासे इत्यादी सर्व दुकाने जळून खाक झाली आहे.

दरम्यन, घटनास्थळी पुणे कॅन्टोन्मेंट अग्निशामक दलाचे फायर ऑफिसर प्रकाश हासबे साहेब, तांडेल असिफ शेख, फायरमन अनिल ताजने, प्रमोद चव्हाण, सचिन भगत, प्रसाद बोराटे, निखिल जगताप, पंकज रसाळ, ड्रायव्हर बालाजी धाकपडे, जीवन जगताप पोहचले असून त्यांनी आगीवर नियंत्रण मिळविण्याचे काम केले.

Post a comment

0 Comments