कचरा प्रक्रिया प्रकल्प बंद करण्याची मागणी नगरसेवक गणेश ढोरे यांनी महापालिका आयुक्त यांच्याकडे केली आहे.



पुणे :  पुणे-फुरसुंगी-उरुळी देवाची कचराडेपोवर सुरु होणाऱ्या २०० मे.टन च्या भूमी ग्रीन कचरा प्रक्रिया प्रकल्पास ग्रामस्थांचा विरोध असल्याचे सांगत हा कचरा प्रक्रिया प्रकल्प बंद करण्याची मागणी नगरसेवक गणेश ढोरे यांनी महापालिका आयुक्त यांच्याकडे केली आहे.

भौगोलिक दृष्ट्या राज्यातील सर्वात मोठे शहर असणाऱ्या पुणे शहराचा बहुतांशी कचरा गेल्या २५ वर्षापासून फक्त उरळी फुरसुंगी कचरा डेपो येथे टाकण्यात येत आहे. न्यायालयीन आदेशानुसार राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्यसंस्थाना कचरा प्रक्रिया प्रकल्प राबविणे बंधनकारक केल्यावर शहराच्या विविध भागात लहान मोठ्या क्षमतेचे प्रक्रिया प्रकल्प उभारले मात्र, उरुळीदेवाची-फुरसुंगी ग्रामस्थांवर २५-३० वर्षांपासून अन्याय करत फुरसुंगी मधे सर्वात मोठा कचरा प्रकल्प प्रशासनाने उभारला, लहान मोठया क्षमतेचे सर्व प्रकल्प पुणे मनपा साठी निरुपयोगी ठरले असुन सदर प्रकल्पांपैकी बहुतांशी प्रकल्प बंद अथवा खुप कमी कालावधीयाकाळात तेथील सर्व कचरा अव्याहत पणे उरळी फुरसुंगी डेपो येथे आणला जातो.आजतागायत कचरा डेपो च्या प्रादर्भावाने परिसरात वर्षाच्या १२ महीने २४ तास असणारी दुर्गंधी, कायमस्वरूपी दूषित झालेले पाणी स्त्रोत, वाहतूक कोंडी, धुळीचे लोट, नागरिकांना जडलेले गंभीर श्वसनाचे विकार, कचऱ्यातील भंगार वेचणाऱ्या लोकांच्या भांडणातून वाढलेली गुन्हेगारी, गावातील ओढ्यात सातत्याने बाहणारे लीचेड, परीसरात निर्माण होणारे डासांचे लोट यामुळे येथील स्थानिक नागरिकांचे जगणे अवघड झाले आहे. यासाठी स्थानिक ग्रामस्थानी वारंवार केलेल्या उग्र आंदोलनाच्या पार्श्वभूमिवर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी येथील कचरा डेपो कायमस्वरूपी बंद करण्याचे कबूल करत अन्यत्र शासकीय जमीन कचरा डेपो प्रयोजनकरतादेण्याचे कबूल केले, त्याप्रमाणे शासनाने पिंपरी-सांडस व अन्यत्र शासकीय जागा उपलब्ध केल्या, परंतु, अद्यापही दुर्दैवाने पुणे शहरात व इतर ठिकाणी राज्य शासनाने देवू केलेली जागा कचरा प्रकल्पासाठी ताब्यात घेण्यात महापालिका प्रशासनाला कोणतेही यश आलेले नाही.विषयांकित कचराडेपो वर २०० टनाचा १५ वर्ष मुदतीकरीता नवीन कचरा प्रकल्प सुरु करण्यासाठी मनपाने वर्कऑर्डर दिली आहे. यास माझा तीव्र आक्षेप आहे, २००५ पासून आजपर्यंत ३५ कि. मी.


व्यासाच्या पुणे शहरातील सर्व कचरा या ना त्या प्रकारे विषयांकित ठिकाणी टाकला जात आहे. तसेच हरित लवादाच्या आदेशाचे उल्लंघन व स्वत: सादर केलेल्या प्रतिज्ञापत्राचा अवमान करते सदर ठिकाणी राजरोसपणे कचरा ओपन डम्पिंग केलेला ९ लाख मे, टना पेक्षा अधिक कचरा आहे. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर तात्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या आश्वासनानुसार सदरचा कचरा डेपो कायमस्वरूपी बंद करण्याऐवजी आता नव्याने २०० मे. टनाच्या प्रकल्प चाल करण्यासाठी टेंडर प्रक्रियेला दि.२७.०२.२०२० रोजी पुणे मनपा स्थायी समितीने १५ वर्ष मुदतीकरता मंजूरी देऊन, कचराडेपो पुढील १५ वर्ष सुरू ठेवण्याचा कट रचला आहे. यास ऊरूळीदेवाची-फुरसुंगी नागरिकांचा तीव्र विरोध आहे. गेल्या २५ ते ३० वर्षांपासून कचरा डेपोचा त्रास आम्ही ग्रामस्थ सहन करीत असल्यामुळे हा प्रकल्प आपण इतर ठिकाणी स्थलांतरीत करावा. आम्ही वारंवार विरोध करूनही गेली २५-३० वर्षांपासून हा पुणे शहराचा कचराडेपो व प्रकल्प आम्हा फुरसुंगी-उरुळी देवाची ग्रामस्थांच्या माथी मारले जात आहेत.

ऊरूळी देवाची-फुरसुंगी व येथील कचरा डेपोच्या जागेवर कोणताही प्रक्रिया वा विनाप्रक्रिया स्वरूपाचा कचरा टाकू नये, याठिकाणी कोणतीही नविन टेंडर प्रकिया राबवून कचरा प्रकल्प राबवू नये, पुणे शहराच्या अन्य ठिकाणी नविन जागा शोधून तेथे कचराडेपो करावा, माझे प्रभागातील गावामध्ये कोणत्याही परिस्थितीत यापुढील काळात कचरा टाकणेस व कचरा प्रकल्पास आम्ही या गावचे नागरिक व लोकप्रतिनिधी मज्जाव करत आहोत.सद्यस्थितीत राज्य शासनाच्या प्रदूषण नियंत्रण महामंडळाकडून काही सशर्त अटी शर्तीवर सदर कचरा प्रक्रिया प्रकल्प चालवणेस मंजुरी घेतली आहे. सदर मंजुरी ही आक्षेपार्ह असून याठिकाणी कोणताही कचरा प्रक्रिया प्रकल्प करणेस आमचा आक्षेप आहे. तरीही सशर्त परबानगीमधील अटी शतीचेदेखील पालन न करता सदर जागेवर नाममात्र स्ट्रक्चर उभारले असताना ठेकेदारास ६. २५कोटी.रु..देण्याचा प्रशासनाने कट रचला आहे. याबाबत मी लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे ग्रामस्थांच्या वतीने तक्रार करणार आहे.समाविष्ट गावांना मुलभूत विकासकामांना नाममात्र निधी दिला जातो. या गानामधून मोठ्या प्रमाणात करवसुली केली जाते त्याप्रमाणात विकासकामे होत नाहीत. एकीकडे मुलभूत विकासकामांसाठी तरतूद उपलब्ध नाही म्हणून कामे केली जात नाहीत. तर दुसरी कडे स्थानिक ग्रामस्थांचा २५ते ३० वर्षापासूनचा विरोध असताना देखील या प्रकल्पचालक, ठेकेदारांच्या हितासाठी त्यांची बिले आर्थिक तडजोडीने अदा केली जातात ही बाब आपण गांभीर्याने लक्ष देण्यासारखी आहे.तरी, गेले २५ वर्षांपासून आमच्या माथी मारला जाणारा विषयांकित कचराडेपो वर सद्यस्थितीत सुरु असलेले सर्व कचराप्रकल्प बंद करुन सदर कचरा डेपो कायमस्वरूपी बंद करावा. तसेच मे.भूमिग्रीन कंपनीस दिलेल्या वर्क ऑर्डर रद्द करून सदर प्रकल्प अन्य ठिकाणी हलवावेत व त्यांची कोणतीही बिले अदा करू नयेत. अशी मागणी नगरसेवक गणेश ढोरे यांनी केली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post