CP अमिताभ गुप्ता यांचा गुन्हेगारांना आणखी एक दणका ! कोंढव्यातील मुनाफ पठाण टोळीतील 9 जणांवर ‘मोक्का’, कृष्णराज आंदेकरचा देखील समावेश



पुणे : कोंढवा - गुन्हे करणार्‍यांना पोलीस आयुक्त हे मोक्काचा दणका देत म्होरके आणि टोळ्या कारागृहात पाठवत असून, आता कोंढव्यातील मुनाफ पठाण टोळीवर पोलीस आयुक्तांनी कारवाई केली आहे. बंडू आंदेकरवर मोक्का लावल्यानंतर कृष्णाराज आंदेकर याचा या मोक्कात समावेश आहे.

मुनाफ रियाज पठाण (वय 23, नाना पेठ), कृष्णाराज सूर्यकांत आंदेकर (वय 31), विराज जगदीश यादव (वय 25), आवेज आशपाक सय्यद (वय 20), अनिकेत ज्ञानेश्वर काळे (वय 25), अक्षय नागनाथ कांबळे (वय 23), शहावेज उर्फ शेरु अब्दुल रशीद शेख (वय 34), अमन युसूफ खान (वय 20) व यश सुनील ससाणे (वय 20) अशी मोक्कानुसार कारवाई करण्यात आलेल्याची नावे आहेत. या सर्वांना अटक करण्यात आली आहे.


मुनाफ पठाण हा टोळी प्रमुख आहे. दरम्यान, जानेवारी महिन्यात त्यांनी कोंढवा परिसरात एका तरुणावर गोळीबार केला होता. यात एक तरुण जखमी झाला होता. तो पोलीस ठाण्यात जात असताना पुन्हा पाठलाग करून त्याला जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या टोळीवर 9 गुन्हे दाखल आहेत. मुनाफ पठाण याने इतरांना एकत्रित करून संघटितपणे गुन्हे करून दहशत निर्माण केली होती.

यामुळे या टोळीवर मोक्काची कारवाई करण्याचा प्रस्ताव वरिष्ठ निरीक्षक सरदार पाटील यांनी सादर केला होता. परिमंडळ पाचच्या उपायुक्त नम्रता पाटील यांनी या प्रस्तवाची छाननी केली व तो अप्पर पोलीस आयुक्त नामदेव चव्हाण यांच्याकडे सादर केला. त्यानुसार पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार चव्हाण यांनी मोक्काची कारवाई केली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post