आदर्श पत्रकार महासंघ शाखा दत्तवाड च्या अध्यक्ष पदी दैनिक महानकार्य चे संजय गोविंद सुतार तर उपाध्यक्ष पदी दैनिक महासत्ता चे मुस्ताक अपराध याची बिनविरोध निवड.
दत्तवाड- आदर्श पत्रकार महासंघ शाखा दत्तवाड च्या अध्यक्ष पदी दैनिक महानकार्य चे संजय गोविंद सुतार तर उपाध्यक्ष पदी दैनिक महासत्ता चे  मुस्ताक अपराध याची बिनविरोध निवड करण्यात आली दत्तवाड येथे झालेल्या बैठकीच्या अध्यक्ष पदी जिल्हा अध्यक्ष गणेश पाखरे होते. तर जिल्हा सचिव शिवकुमार मुरतले हे प्रमुख उपस्थित होते

                  यावेळी पाखरे यानी महासंघाची आचारसंहिता व नियमावली याची माहिती पत्रकारांना दिली त्यानंतर दतवाड शाखेच्या कार्यकारिणीची निवड करण्यात आली  खजिनदार पदी जहागिर रणमल्ली  , सचिव पदी पांडुरंग साने, तर सघटक पदी युनुस लाडखान याची  एक वर्षासाठी निवड करण्यात आली . यावेळी  नुतन पदाधिकारी याचा सत्कार करण्यात आला . 

             निवड बैठकीस मिलिंद देशपांडे, युवराज पाटील, पृथ्वीराजसिंह रजपुत ओमकार पाखरे अर्जुन धुमाळे उपस्थित होते.

Post a comment

0 Comments