समाज कार्याचा गौरव



 इचलकरंजी :    सामाजिक उन्नती बद्दल करीत असलेली नि:स्वार्थ समाजसेवा, विविधतेतून एकता व ऐक्य जोपासण्याची सांस्कृतिक परंपरा, समता व बंधुता ही तत्वे प्रमाणभूत मानून सामाजिक व धडाडीने समाजसेवा करण्याची तळमळ यास अनुसरून लिंगायत समाज रुद्रभूमी (स्मशानभूमी) मध्ये उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल *पद्मजा फिल्म अँड टेलिव्हिजन वेल्फेअर असोसिएशन, सांगोला* यांचे मार्फत *वीरशैव उत्कर्ष मंडळ, इचलकरंजी संचलित लिंगायत समाज रुद्रभूमी (स्मशानभूमी) कामिटीस आदर्श प्रेरणा गौरव पुरस्काराने व राष्ट्रीय फिनिक्स ऑवार्ड 2021* ने सन्मानित करण्यात आला सदरचा पुरस्कार *सिनेअभिनेत्री पद्मजा खटावकर* व कार्याक्रमाचे अध्यक्ष *श्री चंद्रकांत आजगेकर, आजरा,  सिनेअभिनेता मदन पलंगे. शिंगाडे चारीटेबल ट्रस्ट बेळगाव चे अध्यक्ष श्री विक्रम शिंगाडे यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला* पुरस्कार स्वीकारताना  रुद्रभूमी कमिटीचे *उमेश पाटील, सुनील चिंगळे, सुरेश जमदाडे, शंकर बिळूर, सुभाष तोडकर, शिवबसू खोत, सचिन मडिवाळ, नागेंद्र पाटील, सचिन देशमाने, अशोक पाटील,  राजू कोरे (तारदाळे), महादेव बन्ने, अविनाश पाटील,  सुशांत कोरे, निलेश देसाई, नंदकुमार लंबे, प्रशांत तुबचे इत्यादी सन्मानीय सदस्य उपस्थित होते.*

सदर कार्यक्रमास श्री बाळासाहेब पाटील, सौ. व श्री एस. टी. खोत, सुशांत मुरदंडे, प्रभाकर पाटील, चिंतामनी हावळे व समाजबांधव उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post