कृष्णा नदीवरील कोथळी हरिपूर पुलाच्या कामाची राज्यमंत्री यड्रावकर यांनी केली पाहणी. पुलासाठी भूसंपादन झालेल्या शेतकऱ्यांच्या जमिनीचा मोबदला तातडीने द्यावा असे दिले आदेश

.



कोथळी-

कोथळी हरिपूर दरम्यान असलेल्या कृष्णा नदीवर नव्याने उभारल्या जात असलेल्या पुलाची पाहणी सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी शनिवारी केली, पुलाची उभारणी तातडीने पूर्ण करावी असे सांगताना या ठिकाणी उपस्थित असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना विविध सूचना दिल्या, पूल उभारणीसाठी या परिसरातील ज्या शेतकऱ्यांच्या शेत जमिनींचे संपादन शासनाने केले आहे, अशा शेतकऱ्यांना संपादित केलेल्या जमिनीचा मोबदला मिळाला नसल्याबाबतची माहिती राज्यमंत्री यड्रावकर यांना दिली, यावर राज्यमंत्री यड्रावकर यांनी प्रांताधिकारी व उपस्थित सार्वजनिक बांधकाम अधिकाऱ्यांना या शेतकऱ्यांना एका महिन्याच्या आत तातडीणे मोबदला देण्याबाबतचे आदेश दिले, २१० मीटर लांबीच्या या पुलासाठी सन २०१८ मध्ये प्रशासकीय मान्यता मिळाली होती, मुख्य पुलासाठी नाबार्डकडून १५  कोटी, तर दोन्ही बाजूच्या जोड रस्त्यांसाठी महाराष्ट्र शासनाच्या अर्थसंकल्पामधून १० कोटी तर भूसंपादनासाठी ६.५ कोटीची तरतूद केली होती, सन २०१९ मध्ये पुलाच्या बांधकामास प्रत्यक्ष सुरुवात झाली सध्या पुलाचे  दोन्ही बाजूकडून साठ टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित काम जून २०२१ च्या  पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्यासाठीचे नियोजन झाले असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मिरज विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. रोकडे यांनी यावेळी दिली, सांगली कोल्हापूर जिल्ह्याला जोडणाऱ्या या पुलामुळे सांगली कोल्हापूर हे अंतर कमी होईल त्याच बरोबर कोल्हापूर जिल्ह्याच्या शिरोळ तालुक्यामधील कवठेसार, दानोळी, तमदलगे, निमशिरगाव, चिपरी, जैनापूर, उमळवाड, कोथळी या गावांसह परिसरातील सर्व गावांमधील नागरिक, शेतकरी, व्यापारी, उद्योजक व विद्यार्थ्यांना या पुलामुळे मोठा लाभ होणार असल्याचेही रोकडे यांनी यावेळी सांगितले, यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे श्री. क्षिरसागर, यांच्यासह शिरोळ पंचायत समितीचे उपसभापती राजगोंडा पाटील, कोथळी चे सरपंच वृषभ पाटील, देवगोंडा पाटील, संजय नांदणे, गौतम इंगळे, रावसो बोरगावे, शीतल पाटील, अमोल हंकारे, सचिन कांबळे, वैभव इंगळे, नितीन वायदंडे, हिदायत नदाफ, राजेश विभुते यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.



Post a Comment

Previous Post Next Post