कात्रज : अखेर सकाळी साडे अकरा वाजता आग पूर्णपणे विझविण्यास अग्निशामक दलास यश



पुणे - स्वारगेट सातारा रस्त्यावरील कात्रज येथील राजीव गांधी प्राणीसंग्रहालय समोरील कचरा प्रकल्पातील खत प्रकल्पाला आग लागली. पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. याची माहिती मिळताच अग्निशामक दल घटनस्थळी दाखल झाले असून आग विझविण्याचे काम सुरु आहे.

अग्निशामक दलातील 20 ते 25 कर्मचारी पहाटे पाच वाजल्यापासून आग विझवण्याचे काम करत आहे सुदैवाने कोणतीही वित्तहानी व 

पुणे महानगरपालिकेत ग्रामपंचायत आली पण परिसर तहानलेलाच

'आग विझवण्यासाठी टिंबर मार्केट मधून एक टँकर, कोंढवा बुद्रुक मधून एक गाडी आणि कात्रज मधील एक अग्निशामक गाडी अशा तीन गाड्या घटनास्थळी बोलविण्यात आल्या होत्या. त्यानंतर आग आटोक्यात आणण्यात आली. पुन्हा पेटू नये म्हणून कुलिंगही करण्यात आले आहे.'

- सुभाष जाधव, प्रभारी अधिकारी, कात्रज अग्निशामक दल हानी नाही.

Post a Comment

Previous Post Next Post