शिक्रापूर ग्रामपंचायत सरपंचपदी बांदल , उपसरपंचपदी राष्ट्रवादीचे सुभाष खैरे .



शिक्रापूर (ता. शिरूर) या महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीत मंगलदास बांदल गटाला कमी जागा मिळाल्या; मात्र सरपंच पदाचे आरक्षित उमेदवार बांदल गटाकडे होते. त्यांनतर आरक्षणाबाबत आक्षेप घेतला गेल्याने सरपंच उपसरपंच पदाची निवडणूक लांबली गेली. सर्व घडामोडीनंतर आज सरपंच, उपसरपंच पदाची निवडणूक पार पडली. सरपंचपदी बांदल गटाचे रमेश गडदे बिनविरोध निवड झाली. उपसरपंच पदाच्या निवडणुकीत उपसरपंचपदी राष्ट्रवादीचे सुभाष खैरे हे नऊ मते मिळवित विजयी झाले.

शिक्रापूर ग्रामपंचायत निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. एक जागा बिनविरोध झाली आणि सोळा जागेसाठी झालेल्या निवडणुकीत मंगलदास बांदल गटाला सात तर राष्ट्रवादीच्या बापूसाहेब जकाते, आबासाहेब करंजे, आबाराजे मांढरे, अरुण करंजे बाबासाहेब सासवडे, सोमनाथ भुजबळ यांच्या गटाला नऊ जागा मिळाल्या.यानंतर आरक्षण जाहीर झाले असताना सरपचंपद अनुसूचित जातीसाठी आरक्षित झाले. या जागेसाठी मंगलदास बांदल गटाकडेच एकमेव सदस्य असल्याने विरोधी गटाने उच्च न्यायालयात धाव घेतली. त्यामुळे शिरूर तालुक्‍यातील तब्बल 71 ग्रामपंचायतची निवडणूक प्रक्रिया लांबणीवर गेली.

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने निवडणूक पार पडत असताना आज झालेल्या सरपंच, उपसरपंच पदाच्या निवडणुकीदरम्यान मयूर करंजे, वंदना भुजबळ, सारिका सासवडे, मोहिनी युवराज मांढरे, कृष्णा सासवडे, शालन राऊत, त्रिनयन कळमकर, पूजा भुजबळ, प्रकाश वाबळे, कविता टेमगिरे, उषा राऊत, विशाल खरपुडे, रमेश थोरात, सिमा लांडे, रमेश गडदे, सुभाष खैरे, मोहिनी संतोष मांढरे हे उपस्थित होते.

यावेळी सरपंच पदाचे एकमेव दावेदार असलेले रमेश थोरात यांनी सरपंचपदासाठी अर्ज दाखल केला तर उपसरपंच पदासाठी राष्ट्रवादीचे सुभाष बबन खैरे व मंगलदास बांदल गटाच्या शालन अनिल राऊत व मोहिनी युवराज मांढरे यांनी अर्ज दाखल केला. अर्ज मागे घेण्याच्या वेळेत शालन राऊत यांनी अर्ज मागे घेतला. सरपंच पदी रमेश गडदे यांची निवड बिनविरोध झाली. तर उपसरपंच पदासाठी मोहिनी मांढरे व सुभाष खैरे यांच्यात निवडणूक झाली. यावेळी सुभाष खैरे यांना नऊ तर मोहिनी मांढरे यांना आठ मते मिळाली.

त्यामुळे उपसरपंच पदी सुभाष उर्फ सुदाम खैरे यांची निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी उद्धव ढापसे व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा ग्रामविकास अधिकारी बापूसाहेब गोरे यांनी जाहीर केले.

आमदार आपल्या पक्षाचा नाही
शिक्रापूर येथील ग्रामपंचायत सरपंच व उपसरपंचपदाची निवडणूक पार पडल्यानंतर ग्रामदैवत मंदिरात सरपंच, उपसरपंच दर्शनासाठी आले आणि उपसरपंच गट दर्शन घेऊन गेल्यानंतर भारतीय जनता पार्टीचे एक ज्येष्ठ नेते हे युवकांना मास्क लावा, गर्दी करू नका, शांतता राखा. सत्ता आपली नाही, आमदार आपल्या पक्षाचा नाही असा सल्ला देत होते.

सरपंच, उपसरपंच वेगळ्या गटाचे
यावेळी सरपंच एका गटाचा व उपसरपंच एका गटाचा झाल्याने दोन्ही गटांनी ग्रामदैवत भैरवनाथ मंदिराचे दर्शन घेऊन घरचा रस्ता धरला; मात्र यावेळी कोणतीही घोषणाबाजी अथवा भाषण झाले नाही. निवडणूक कार्यक्रम शांततेत पार पडला. सहायक पोलीस उपनिरीक्षक जयप्रकाश चव्हाण व हवालदार दत्तात्रय होले यांनी चोख बंदोबस्त ठेवलेला होता.

Post a Comment

Previous Post Next Post